एक्स्प्लोर
बालपणी आई-वडिलांची साथ सुटली, त्यानंतर नशीबी अठराविश्व दारिद्र्य; फक्त एका निर्णयानं बनवलं राजेश खन्ना यांना बॉलिवूडचा 'पहिला सुपरस्टार'
Rajesh Khanna: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे 'काका' म्हणजेच, राजेश खन्ना... यांची आज जयंती. अत्यंत खडतर परिस्थितीतून आल्यानंतर त्यांनी एकेकाळी बॉलिवूडचा ताबा घेतला होता.

Rajesh Khanna Birth Anniversary
1/8

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या संघर्षाच्या अनेक कहाण्या आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारच्या आयुष्यातील संघर्षाचे काही किस्से आणि त्यांच्या रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या कदाचित फार कमी लोकांना माहीत असतील. एका अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेल्या मुलानं पुढे येऊन बॉलिवूडमध्ये आपलं साम्राज्य उभं केलं. राजेश खन्ना यांचं बालपण गरिबीत गेलं, त्यांच्या आई-वडिलांचा आधार कसा गमावला आणि ऐन तारुण्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताच त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीला आपल्या तालावर नाचवलं.
2/8

राजेश खन्ना यांचं खरं नाव 'जतिन खन्ना' होतं. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. राजेश खन्ना यांचे वडील फाळणीपूर्वी शिक्षक म्हणून काम करायचे. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब अमृतसरला आलं आणि नोकरी गेल्यानं घरची आर्थिक परिस्थिती खालावली होती. घरची परिस्थिती पाहून वडिलांनी राजेश खन्ना यांची जबाबदारी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवली होती.
3/8

जुलै 2012 मध्ये राजेश खन्ना यांनी हे जग सोडलं, तेव्हा त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचा आसवांचा बांध फुटला होता. पण राजेश खन्ना यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये जिवंत आहे.
4/8

राजेश खन्ना किती प्रसिद्ध होते की, त्यांना येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची पत्रं उघडण्यासाठी त्यांना वेगळा कर्मचारी ठेवावा लागला होता. राजेश खन्ना यांनी सलग वीस वर्ष इंडस्ट्रीवर आपली सत्ता कायम ठेवली.
5/8

राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या तीन वर्षांत 15 सुपरहिट चित्रपट देऊन एक विक्रम रचला होता. तेव्हापासूनच त्यांना बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हटलं जाऊ लागलं.
6/8

राजेश खन्ना यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि ते वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर आले. राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांना त्यांनी अभिनय हे करिअर म्हणून स्वीकारावं, असं अजिबात वाटत नव्हतं. पण त्यांनी त्यांच्या मनाचं ऐकलं आणि स्वतःच्या चित्रपट कारकिर्दीसाठी नाव जतिनवरून बदलून राजेश खन्ना असं ठेवलं.
7/8

राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये 'आखरी खत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी 'राझ' या चित्रपटाद्वारे पडद्यावर अशा प्रकारे अधिराज्य गाजवलं की, त्यांच्याइतकं स्टारडम कोणीही मिळवू शकलं नाही.
8/8

राजेश खन्ना यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले होते. राजेश खन्ना यांच्या 'राझ' चित्रपटाचं बजेट 65 लाख रुपये होतं आणि चित्रपटानं एक कोटींहून अधिक कमाई केली होती.
Published at : 29 Dec 2024 09:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
