Shreyas Talpade Health Update : श्रेयसची प्रकृती सुधारतेय, तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच, पण... : दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली आहे.
Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आला असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता श्रेयसची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्याची पत्नी दिप्ती तळपदेने दिली आहे.
श्रेयस तळपदेच्या पत्नीने दिली हेल्थ अपडेट (Deepti Talpade On Shreyas Talpade Health Update)
श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती पतीच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत म्हणाली की,"माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि शुभेच्छांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल. त्याच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देताना मला समाधान मिळत आहे".
दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन
दिप्ती पुढे म्हणाली,"या कठीण काळात बेलव्यू रुग्णालय आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने वेळेवर दिलेला प्रतिसाद महत्तवाचा ठरला आहे. त्यामुळे त्यांचीही मी कृतज्ञ आहे. पण चाहत्यांना माझं भावनिक आवाहन आहे की, आमच्या गोपनीयतेचा कृपया आदर करावा. तुमचा अतूट पाठिंबा हाच आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्त्रोत आहे".
View this post on Instagram
श्रेयस तळपदेची प्रकृती स्थिर
श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी डॉक्टरांनी श्रेयसच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली सध्या श्रेयसवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. त्याची अँडिओप्लास्टीदेखील करण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला आहे.
श्रेयस तळपदे सध्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. तसेच कंगना रनौत (Kangana Ranaut) दिग्दर्शित 'इमरजेंसी' या सिनेमात तो दिसणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या