एक्स्प्लोर

Stree 2 Movie : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री-2' चित्रपटात प्रेक्षकांना सरप्राइज! 'हा' अभिनेता दिसणार कॅमिओ रोलमध्ये?

Stree 2 Movie Updates : सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचे चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत आणखी एक अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राइज असणार आहे.

Stree 2 Movie Updates : राजकुमार राव  (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Sharaddha Kapoor) स्टारर हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री' 2018 साली रिलीज झाला होता. या हॉरर कॉमेडीपटाला प्रेक्षकांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिला. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचे 'स्त्री-2'चे (Stree 2) चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत आणखी एक अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

पाहुण्या कलाकाराने पूर्ण केले 'स्त्री 2'चे शूटिंग 

'बॉलिवूड हंगामा'च्या एका वृत्तानुसार, अभिनेता वरुण धवन हा स्त्री-2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणने श्रद्धा कपूरसोबत छोट्या भूमिकेसाठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.  वरुण 'स्त्री 2' मध्ये लांडग्याची  भूमिका साकारू शकतो. भेडिया चित्रपटात वरुणने  लांडग्याची व्यक्तीरेखा साकारली होती.  वरुणची भूमिका ही क्रॉसओव्हरचा एक भाग दाखवण्यात आला आहे. 'भेडिया-2' या चित्रपटातील वरुणच्या व्यक्तिरेखेची यातून पार्श्वभूमी दर्शवली जाणार असल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार, वरुणने श्रद्धासोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये  याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shraddha Kapoor (@shraddhakapoor)

'भेडिया-2' चे चित्रीकरण हे पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये  सुरू होण्याची शक्यता आहे. स्त्री-2 ची कथा ज्या ठिकाणी संपते तिथून या भेडिया-2 चे चित्रीकरण सुरू होणार असल्याचे म्हटले जाते. सध्या  स्त्री-2 चे चित्रीकरण सुरू आहे. 

'स्त्री 2' कधी रिलीज होणार?

श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट स्त्री 2 बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित 'स्त्री' सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. यानंतर, 2022 मध्ये वरुण धवनचा हॉरर कॉमेडी चित्रपट भेडिया आला, ज्यामध्ये क्रिती सेनन को-स्टार होती. हा चित्रपटही हिट ठरला होता.

राजकुमार राव (Rajkummar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री' (Stree) या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्यानंतर आता चित्रीकरण सुरू असून प्रेक्षकांना सरप्राइज मिळणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Pune ZP Election Result : पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार? जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार
Raigad ZP Elections Results 2026: रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
रायगड जिल्हा परिषदेत गोगावले गड राखणार की भाजपचं कमळ फुलणार का? कोणाची सत्ता येणार?
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget