(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्टार किड असण्याचा फायदा होतो? अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया म्हणते...
अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Shanaya Kapoor on being starkid: अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार, लवकरच ती दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) चित्रपटामध्ये काम करणार आहे. शनायाने ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरने (Jahnvi Kapoor) प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शनायाने स्टार किड असण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत?, त्याबद्दल सांगितले. शनाया म्हणाली, 'मी नेहमी सकारात्मक राहते. माझे चाहते असो किंवा माडिया मी अशाच लोकांकडे लक्ष देते जे मला प्रोत्साहन देतात. तेच माझ्या फायद्याचे आहे. मी त्यांच्या प्रेमावर आणि सपोर्टवर नेहमी लक्ष देते. बाकी गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या ठरत नाहित.'
'आयला रे आयला': सूर्यवंशीचं धमाकेदार गाणं प्रदर्शित; अक्षय, अजय, रणवीर या त्रिकूटाचा भन्नाट डान्स
अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी शनायाने दिग्दर्शन केले आहे. ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटाबद्दल शनायाने सांगतले, 'गुंजन सक्सेना या चित्रपटाचा एक भाग होऊन खूप छान वाटले. हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. मला शिकायचे होते की चित्रपट कसा तयार होतो. चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस मला बघायची होती. मला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या की, चित्रपटाच्या सेटवर कोण कसं काम करतं? तसेच कलाकार त्यांच्या भूमिकेची कशी तयारी करतात. या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये मी बरचं काही शिकले. टिम कशी काम करते ते मला शिकायला मिळाले. '