Prabhas Birthday Celebration : साउथचा स्टार Prabhas चा वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सिनेमागृहात पुन्हा एकदा पाहता येणार 'मिर्ची' सिनेमा
Prabhas Birthday Celebration : प्रभास 23 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे.
Prabhas Birthday Celebration : प्रभास (Prabhas) त्याचा वाढदिवस 23 ऑक्टोबरला साजरा करणार आहे. प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसाची तयारी करायला सुरुवात केली आहे. याखास दिवसाच्या निमित्ताने प्रभासच्या चाहत्यांसाठी खूश खबर आहे. प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा तेलुगु राज्यातील सिनेमागृहांत पुन्हा एकदा पाहता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंदाला चार चांद लागले आहेत.
प्रभासच्या वाढदिवसाला झाली सुरुवात
प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शन कोराताली शिवा यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. आठवर्षांनंतरही प्रभासचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. प्रभास हा साउथचा लोकप्रिय कलाकार आहे. प्रभासच्या प्रत्येक सिनेमावर चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्या बाहुबली सिनेमानेदेखील अनेक रेकॉर्ड तोडले होते. बाहुबली नंतर प्रभासचा चाहतावर्ग दुप्पट झाला होता. साउथ व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकारदेखील प्रभासचे फॅन झाले होते. लवकरच बॉलिवूडची एक बडी अभिनेत्री प्रभाससोबत काम करताना दिसून येणार आहे.
मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार प्रभासचा 'मिर्ची' सिनेमा
मनोबाला विजयबलन ने ट्विट करत जाहीर केले आहे, प्रभासच्या वाढदिवसानिमित्त सिनेमागृहांत 'मिर्ची' सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. प्रभास पूजा हेगडे सोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट 1920 सालातील इटलीतील घटणेवर आधारित आहे. चित्रपटात प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
या चित्रपटांत दिसणार प्रभास
प्रभास लवकरच एका वैज्ञानिक चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनदेखील दिसून येणार आहेत. त्यात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राउत करणार आहेत.
कार्तिकने शेअर केला ट्रेलर
धमाका चित्रपटाचा ट्रेलर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेअर केली. हा ट्रेलर शेअर करून कार्तिकने त्याला कॅप्शन दिले, 'मी अर्जुन पाठक आहे. जे काही बोलेन ते खरं बोलन'. कार्तिकच्या चाहत्यांनी त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. कार्तिक या चित्रपटामध्ये अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की , अर्जुन पाठकला रेडियो शोमध्ये एक अलार्मिंग कॉल येतो आणि त्या कॉलमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते.