(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shamshera Official Trailer : रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा ट्रेलर रिलीज होणार, यशराजच्या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता!
Shamshera Official Trailer : दोन वर्षांपासून प्रदर्शित होण्याची वाट पाहणाऱ्या यशराज फिल्म्सच्या 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज (24 जून) आठवड्यात प्रदर्शित होत आहे.
Shamshera Official Trailer : दोन वर्षांपासून प्रदर्शित होण्याची वाट पाहणाऱ्या यशराज फिल्म्सच्या 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज (24 जून) प्रदर्शित होत आहे. कोरोना काळात पहिला लॉकडाऊन संपताच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते. या चित्रपटात रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उत्तर भारतातील एका बंडखोराची चोराची भूमिका केली आहे, जो गरीबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील या कथेत अभिनेत्री वाणी कपूरही (Vaani Kapoor) एका खास भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील कलाकारांचे लूक रिलीज झाले आहेत.
यशराज फिल्म्ससोबतच अभिनेता रणबीर कपूरसाठीही 'शमशेरा' चित्रपट विशेष खास आहे. 'संजू' चित्रपटाच्या रिलीजच्या चार वर्षानंतर रणबीर कपूर पुढील महिन्यात मोठ्या पडद्यावर परतणार असून, त्याचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. रणबीर कपूरचा आणखी एक 'ब्रह्मास्त्र' चित्रपटही सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानक
काही काळापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'शमशेरा'च्या टीझरमध्ये चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजे संजय दत्त, वाणी कपूर आणि रणबीर कपूर झळकले होते. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील एका डाकूची कथा सांगणारा आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
हिंदीशिवाय 'शमशेरा' तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे. सिनेमात डाकू आदिवासी आपल्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर, अभिनेता संजय दत्त आणि जेष्ठ अभिनेते शरद सक्सेना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा: