Shaktimaan Movie : शक्तिमान परत येतोय; भारतीय सुपरहीरोचा व्हिडीओ पाहुन चाहते उत्सुक
Shaktimaan Movie : सोनी पिक्चर्सनं सोशल मीडियावरील अकाऊंटवर शक्तिमान चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Shaktimaan Movie : छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमानला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनी पिक्चर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून 'शक्तिमान' (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सोनी पिक्चर्सनं सोशल मीडियावरील अकाऊंटवर शक्तिमान चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शक्तिमानचा चेहरा दिसत नाही. पण शक्तिमानच्या पोषाखात एक व्यक्ती उभी असलेली दिसत आहे. शक्तिमान या मालिकेमध्ये अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती पण आता या चित्रपटामध्ये ही भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना पडला आहे.
शक्तिमान चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करून सोनी टिव्हीनं कॅप्शनमध्ये लिहिले,' भारतातील आणि जगभरातील अनेक सुपरहिरो चित्रपटांच्या उत्कृष्ट यशानंतर, आमचा देसी सुपरहिरो तुमच्या भेटीस येणार आहे.'ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनलच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मीती केली जाणार आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट तीन पार्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
शक्तिमान ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली. 2005 पर्यंत शक्तिमान ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकरल्या.
संबंधित बातम्या
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha