एक्स्प्लोर
अमरनाथ हल्ल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया
मुंबई: अमरनाथ यात्रेतील भाविकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्लावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. यावेळी बॉलिवूडकरांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय.
अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ बॉलिवूडचा किंग शाहरुखनं देखील ट्विटरवरुन या घटनेचा निषेध केला. 'निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना.'
दरम्यान या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनंही दु:ख व्यक्त केलं आहे. 'अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे', असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 12 भाविक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला होता.Saddening to see innocent lives being taken. Prayers for the victims & may God give strength to the families of the #AmarnathYatra pilgrims
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 10, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement