Shahid Kapoor Upcoming Movie: तोंडात सिगरेट, पांढरा शर्ट अन् उघडी बटणं... 50 वर्षांपूर्वीचा हुबेहुब बिग बींसारखाच लूक, शाहिदच्या 'देवा'चं मोशन पोस्टर रिलीज
Deva New Motion Poster Out: शाहिद कपूरचा आगामी चित्रपट देवा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आगामी चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे.
Shahid Kapoor Upcoming Movie Deva First Poster Released: बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणजेच, शाहिद कपूर (Shahid Kapoor) लवकरच मोठ्या पडद्यावर खळबळ माजवणार आहे. ॲक्शन आणि सस्पेन्सनं भरलेला 'देवा' (Deva Movie) हा चित्रपट याच महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे, ज्यामध्ये अभिनेत्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळाला आहे.
'देवा'च्या पोस्टरमध्ये शाहिद कपूर एका जबरदस्त अंदाजात दिसत आहे. पांढरा शर्ट, शर्टाची उघडी बटणं, गळ्यात चेन आणि ओठात सिगारेट... शाहिदचा लूक पाहून चाहत्यांना कबीर सिंहची आठवण झाली. मोशन पोस्टरमध्ये सिगारेटमधून निघणारा धूर आणि त्यात शाहिदचा क्लासी लूक आणखीनच भारी दिसतोय. पोस्टरमध्ये शाहिदच्या मागे अमिताभ बच्चन यांचा 'दीवार' चित्रपटात दिसलेला लूक छापण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटात अमिताभ बच्चन अणार का? अशा चर्चांनाही उधाण आलं आहे.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर धमाल करणार फिल्म
'देवा' फिल्मच्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांचा 'दीवार' चित्रपटाचा लूक दिसतोय. ज्यामध्ये तो सिगरेट पित असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता प्रश्न असा आहे की, मेकर्सनी हिंट दिली आहे की, शाहिदचा रोल 1975 मध्ये आलेल्या 'दीवार' चित्रपटाचील बिग बींच्या भूमिकेप्रमाणेच असेल. जर असं झालं तर शाहिद कपूरचं बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करणार, यात काही शंकाच नाही.
चाहत्यांना लागलीय उत्सुकता
शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचं पोस्टर पाहून फॅन्स आपली एक्साइटमेंट थांबवू शकले नाहीत आणि सर्वजण भरभरून कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, "शाहिद, तू कधीच निराश करत नाहीस, हा लूक पाहून माझी एक्साइटमेंट वाढली आहे."
आणखी एकानं लिहिलंय की, "पोस्टर पाहून माझी उत्सुकता आणखीनंच वाढली आहे. मला वाटतंय की, ही शाहिदची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरेल. याशिवाय एका चाहत्यानं कमेंट केली आहे की, "कबीर सिंहनंतर तू पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करू शकतोस."
महत्त्वाच्या इतर बातम्या :