Saif Ali Khan : हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, फुल सिक्युरिटीसोबत घराबाहेर पडतानाचा VIDEO समोर
Saif Ali Khan Spotted After Discharge : अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला हल्ला झाला होता, त्यानंतर त्याला 21 जानेवारीला डिस्चार्ज मिळाला.
Saif Ali Khan Spotted Outside Residence : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला झाल्यापासून तो चर्चेत आहे. सैफ अली खानला रुग्णालयातील डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडला आहे. सैफ त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाला आहे. यावेळी त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर-खानही त्याच्यासोबत दिसली. रविवारी सैफ आणि करिना घराबाहेर पडताना दिसले. सदगुरु शरण इमारतीच्या बाहेर पडताना दोघे कॅमेऱ्यात चित्रित झाले, मात्र, ते दोघे कुठे जात होते, याची माहिती उघड झालेली नाही.
हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला हल्ला झाला होता. त्याच्या राहत्या घरी घुसून चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला होता. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि 21 जानेवारीला सैफला डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ 26 जानेवारीली पहिल्यांदा घराबाहेर पडला. यावेळी सैफ अली खान टी-शर्ट आणि जीन्स अशा कूल लूकमध्ये दिसला. त्याने चष्माही घातला होता.
करीना कपूरचा कॅज्युअल लूक व्हायरल
सैफसोबत करीनाही दिसली. करीना कपूर ओव्हरसाईड टी-शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. यासोबत ती काळा चष्मा आणि काळ्या टोपीने चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली. करीनाने पोनी हेअरस्टाईल आणि पांढऱ्या रंगाच्या शूजसहने तिचा लूक कम्प्लिट केला. करीना आणि सैफचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हल्ल्यानंतर सैफ आणि करिना पहिल्यांदाच एकत्र दिसले.
पाहा व्हिडीओ : हॉस्पिटल डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान
View this post on Instagram