आशा भोसलेंच्या नातीचं टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरसोबत सूत जुळलं? बर्थ डे पार्टीतल्या 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष
Zanai Bhosale Dating Rumours: दिग्गज वर्सेटाईल सिंगर असलेल्या आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांची नात सध्या बॉलिवूडमध्ये काम करतेय. जनाईला आजीप्रमाणे गाण्यात नाहीतर अभिनयात उतरायचं आहे.
Zanai Bhosale Dating Rumours With Cricketer: क्रिकेट (Criket) आणि बॉलिवूड (Bollywood) फार जुनं कनेक्शन, अनेक बॉलिवूड बालांनी क्रिकेटर्सना रियल लाईफमध्ये क्लिनबोल्ड केलंय. अशातच आता आणखी एक सूत जुळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या नातीचं नाव एका दिग्गज क्रिकेटरसोबत जोडलं जात आहे. जनाई भोसले (Zanai Bhosale) ही आशा भोसलेंची (Aasha Bhosale) नात, नुकताच तिचा वाढदिवस पार पडला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमधले क्रिकेटपटूसोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तेव्हापासून जनाई आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
दिग्गज वर्सेटाईल सिंगर असलेल्या आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांची नात सध्या बॉलिवूडमध्ये काम करतेय. जनाईला आजीप्रमाणे गाण्यात नाहीतर अभिनयात उतरायचं आहे. जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आगामी चित्रपटात काम करणार असल्याचं आता समोर आलं आहे.
View this post on Instagram
बर्थडे पार्टीसाठी श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि सिद्धेश लाड उपस्थित
नुकताच जनाई भोसलेची वाढदिवसाची पार्टी चांगलीच गाजली. या पार्टीतले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. पण त्यासोबत टीम इंडियाचे क्रिकेटर्सही उपस्थित होते. या पार्टीसाठी श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि सिद्धेश लाड उपस्थित होते. पण, श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड काही काळासाठी थांबले आणि जनाईला भेटून तिच्यासोबत फोटो काढून निघून गेले. पण, मोहम्मद सिराज मात्र बराच वेळ जनाईसोबत टाईम स्पेंड करताना दिसला.
जनाईच्या बर्थडे पार्टीसाठी मोहम्मद सिराज बराच काळ थांबला होता. जनाई आणि मोहम्मद सिराज यांच्यात बराच काळ गप्पा गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी जनाई आणि मोहम्मद सिराज यांचे काही जणांनी फोटो काढले आणि ते चांगलेच व्हायरल झाले. तेव्हापासूनच जनाई आणि मोहम्मद सिराज यांचं सूत जुळल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :