एक्स्प्लोर

Pathaan: प्रतीक्षा संपली! शाहरुखचा 'पठाण' घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या...

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Pathaan Release To 22 March  On OTT Platform: अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham)  यांच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक प्रेक्षक 'पठाण' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता या प्रेक्षकांची प्रतीक्षा 22 मार्च रोजी संपणार आहे कारण 22 मार्चला  हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. 

पठाण 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

एका संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, पठाण हा चित्रपट 22 मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस झाले आहेत. आता 56 दिवसांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, पठाणचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, पठाणमधील काही डिलीटेड सीन्स देखील ओटीटीवर प्रेक्षकांना बघायला मिळतील. 

पठाणची कमाई

पठाण या चित्रपटाने भारतामध्ये 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट अमेरिका, कॅनडा, यूएई, इजिप्त, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये देखील रिलीज करण्यात आला होता. 

पठाणची तगडी स्टार कास्ट 

पठाण या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता सलमान खानने या चित्रपटात कॅमिओ केला आहे. 

पठाण चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' या दोन गाण्यांवरील रील्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तर 'झुमे जो पठाण' या गाण्यामधील शाहरुखच्या स्टेपने देखील अनेकांचे लक्ष वेधले.

शाहरुखचे आगामी चित्रपट

पठाण नंतर आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kohli's Pathaan Step Viral: विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस; म्हणाला, 'यांच्याकडून शिकावं लागेल'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
Devendra Fadnavis & Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस सभागृहातील बिग डी, आरडओरडा न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतात: एकनाथ शिंदे
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
Embed widget