एक्स्प्लोर

Kohli's Pathaan Step Viral: विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस; म्हणाला, 'यांच्याकडून शिकावं लागेल'

आता काही क्रिकेटर्सला देखील पठाणमधील (Pathaan) गाण्यांची भूरळ पडली आहे, असं दिसत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेटर्स डान्स करताना दिसत आहेत. 

Kohli's Pathaan Step Viral: अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुखची ओळख आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता काही क्रिकेटर्सला देखील पठाणमधील गाण्यांची भूरळ पडली आहे, असं दिसत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही क्रिकेटर्स डान्स करताना दिसत आहेत. 

विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस 

सोशल मीडियावर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जाडेजा आणि विराट हे क्रिकेटच्या मैदानावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुखचं 'झुमे जो पठाण' हे गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ एका नेटकऱ्यानं शेअर करुन लिहिलं, 'या पठाण डान्सबद्दल काय म्हणशील?' या व्हिडीओला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे. 

शाहरुखच्या रिप्लायनं वेधलं लक्ष 

नेटकऱ्यानं शेअर केलेल्या विराट आणि जाडेजाच्या डान्सच्या व्हिडीओला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे. शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं, ' ते माझ्यापेक्षा जास्त छान डान्स करत आहेत. विराट आणि जाडेजा यांच्याकडून मला शिकावं लागेल.' शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.

पाहा व्हिडीओ: 

पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती 

पठाण चित्रपटामधील गाणी हिट ठरली आहेत. या चित्रपटामधील 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तर 'झुमे जो पठाण' या गाण्यामधील शाहरुखच्या स्टेपनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.

पठाण हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले 'झुमे जो पठाण'वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget