(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shah Rukh Khan : शाहरुखची होणारी सून आता ऐकत नसते; आर्यन खानला रुमर्ड गर्लफ्रेंडने सर्वांसमोर दिली फ्लाइंग किस; पाहा VIDEO
Aaryan Khan Rumoured Girlfriend Larissa Bones : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शाहरुखची होणारी सून म्हणजेच आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड लारिसा बोन्सी (Larissa Bonesi) हिने नुकतचं आर्यनला सर्वांसमोर फ्लाइंग किस दिली आहे.
Shah Rukh Khan Son Aaryan Khan Rumoured Girlfriend Larissa Bones : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शाहरुखसह त्याचा लाडका लेक आर्यन खान (Aaryan Khan) संबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. आर्यन खान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खानचं नाव परदेशी अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सीसोबत (Larissa Bones) जोडलं जात आहे. आर्यन आणि लारिसा या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अशातच आता दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखची होणारी सून, आर्यनची रुमर्ड गर्लफ्रेंड लारिसा आर्यन खानला फ्लाइंग किस देताना दिसून येत आहे.
आर्यन खान आणि लारिसा बोन्सी यांच्या डेटिंगच्या अफवांदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आर्यन आणि लारिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आर्यन खानच्या बाजूला मार्टिन गॅरिक्स उभा असलेला दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागे लारिसा उभी आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की लारिसा वारंवार डान्स करत आहे. तर लारिसाचा क्यूट अंदाज पाहायला आर्यन वारंवार मागे वळून पाहत आहे. पुढे लारिसा आर्यनला सर्वांसमोर फ्लाइंग किस देताना दिसून येते. तर आर्यन खान दुसरीकडे लाजताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Another video of Aryan and Larissa at the Martin Garrix from the Martin Garrix Afterparty
byu/tarheel_123 inBollyBlindsNGossip
आर्यन खान आणि लारिसा यांचं हसू पाहून चाहत्यांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत आहे. अद्याप लारिसा किंवा आर्यनकडून याबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. आर्यन खान लारिसासह त्याच्या आईलादेखील सोशल मीडियावर फॉलो करतो. ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान सोशल मीडियापासून दूर होता. आर्यन खान सध्या त्याच्या पहिल्या 'स्टारडम' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. आर्यनच्या या वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे.
लारिसा बोन्सीचा 'असा' आहे प्रवास
लारिसा बोन्सीने परदेशासह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्यासोबत 2011 मध्ये आलेल्या 'देसी बॉईज' या चित्रपटातील 'सुबह होने ना दे' या गाण्यात अभिनेत्री दिसून आली होती. लारिसाने 'थिक्का' या तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली आहे. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या 'Next Enti' या चित्रपटातही अभिनेत्री दिसून आली होती. वरुण धवनसोबतही अभिनेत्रीने काम केलं आहे.
संबंधित बातम्या