(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jawan Sequel : शाहरुखच्या 'जवान'चा सीक्वेल येणार? दिग्दर्शक अॅटली कुमार म्हणाला...
Jawan Sequel : शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shah Rukh Khan Jawan Sequel : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे शाहरुखचे चाहते या सिनेमाचं आणि किंग खानच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही मंडळी मात्र त्याला ट्रोल करत आहेत. आता या बहुचर्चित सिनेमाचा अर्थात 'जवान'चा सीक्वेल (Jawan Sequel) येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
'जवान'च्या सीक्वेलबाबत अॅटली कुमार काय म्हणाला?
'जवान' या सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) याने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत 'जवान'च्या सीक्वेलबाबत भाष्य केलं आहे. एटली म्हणाला,"माझ्या कोणत्याही सिनेमाचा शेवट मी वेगळा करतो. आजपर्यंत मी अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून कोणत्याही सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा मी कधीही विचार केला नाही.'जवान' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही या सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा निर्णय घेत आहोत".
'जवान' या सिनेमात मेगास्टार थलापती विजयचा (Thalpathy Vijay) कॅमिओ असणार असं म्हटलं जात होतं. पण या सिनेमात मात्र त्यांची झलक पाहायला मिळाली नाही. याबद्दल बोलताना थलापती विजय म्हणाला,"जवान' या सिनेमासाठी थलापती विजयला विचारणा करायला हवी होती. शाहरुख आणि विजय सर या दोघांचेही मला आभार मानायचे आहेत. माझ्या करिअरमध्ये दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सिनेमा बनवण्यासाठी मी कायमच सज्ज आहे.
बॉक्स ऑफिसवर 'जवान'चा बोलबाला (Shah Rukh Khan Jawan Box Office Collection)
'जवान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.35 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 2.55 कोटी, तिसऱ्या दिवशी 4.35 कोटी, चौथ्या दिवशी 4.45 कोटी, पाचव्या दिवशी 1.98 कोटी, सहाव्या दिवशी 1.84 कोटी, सातव्या दिवशी 1.8 कोटी, आठव्या दिवशी 1.63 कोटी, नवव्या दिवशी 1.41 कोटी आणि दहाव्या दिवशी 2.48 कोटींची कमाई केली आहे. 'जवान'च्या यशानंतर शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' (Dunky) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
'जवान' या सिनेमाची सध्या जगभर चर्चा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अॅटली कुमार (Atlee Kumar) यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते उत्सुक आहेत. अॅटली कुमार लवकरच 'जवान'च्या सीक्वेलवर काम सुरू करेल. 'जवान 2' हा बिग बजेट सिनेमा असू शकतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या