Shah Rukh Khan : थिएटरमध्ये जल्लोष, थर रचत गोविंदांची सिनेमाला सलामी.. शाहरुखच्या 'Jawan'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; चाहते म्हणाले...
Jawan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
Shah Rukh Khan Jawan Movie Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा बहुचर्चित सिनेमा अखेर आज जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये जल्लोष, ढोल ताशांचा ठेका आणि दहीहंडीचे थर रचत गोविंदांनी सिनेमाला सलामी दिली आहे. किंग खानच्या (King Khan) 'जवान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाला आहे.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा बहुचर्चित असलेला सिनेमा 'जवान' आज रिलीज झाला आहे. त्यासाठी आज सकाळी सहा वाजता सिनेमाच्या पहिल्या शो चं आयोजन करण्यात आलं होतं. शाहरुख खानचा फॅन क्लब 'SRK युनिव्हर्स' द्वारे वांद्र्यातील गेईटी सिनेमागृहात शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शाख खान चाहत्यांनी ढोलताशांच्या गजरात या सिनेमाचं स्वागत केलं. तसंच शाहरुखचा लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोठा चाहतावर्ग आहे. यावेळी एका ज्येष्ठ महिलेनंही ढोल ताशांवर ठेकाही धरला.
शाहरुखसारखा लूक करत त्याच्या काही चाहत्यांनी 'जवान' सिनेमा पाहिला आहे. तर काही चाहते 'जवान' असं लिहिलेलं टी-शर्ट परिधान करुन 'जवान' पाहायला आले होते. भारतात 300 स्क्रीन्सवर चाहत्यांनी 'जवान' सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. भारतासह जगभरातील 60 देशांमध्ये शाहरुखच्या 'जवान'चं खास स्क्रीनिंग आयोजित केलं आहे.
जगभरातील 10000 स्क्रीन्सवर 'जवान' प्रदर्शित!
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा भारतातील तब्बल 5500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर जगभरात हा सिनेमा 10000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 123 ते 150 कोटींची कमाई करू शकतो. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये हा या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे.
शाहरुखचा 'जवान' पाहून चाहते म्हणतात...
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. थिएटरमध्ये जल्लोष करण्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शाहरुखचं आणि सिनेमाचं कौतुक करत आहेत. शाहरुखचा स्वॅगच वेगळा, 'जवान' सिनेमाचं कथानक, सिनेमेट्रोग्राफी आणि अॅक्शन स्टंट कमाल आहेत, 'जवान' सिनेमा आधी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा प्रदर्शित झाला असून आजही सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'जवान'पुढे 'पठाण' (Pathaan) काहीच नाही..विषय संपला".
#Jawan #JawanFirstDayFirstShow
— Rajesh Kumar Pal (@saregamapal) September 7, 2023
FirstHalfReview!
Exceptional opening scenes.
Superb direction from #Atlee
New avatar of @iamsrk unlocked! @NayantharaU @VijaySethuOffl keep you on the edge.
Better than #Pathaan say fans!
Stay tuned on @ABPNews @abplive pic.twitter.com/XGGT1JyAt4
शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान हा आज रिलीज झाला आहे. त्यानिमित्ताने शाहरुखच्या बाळ गोपाल गोविंदा फॅन्सने दहीहंडीचे थर रचत मुंबईतील वांद्रे थिएटर परिसरात शाहरुखला आणि त्याच्या चित्रपटाला सलामी दिली आहे]एटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमात नयनतारा (Nayanthara), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच प्रियमणी (Priyamani) आणि सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील.
I have never seen this kind of craze for any movie star 💥⚡
— 𝐁𝐚𝐛𝐚 𝐘𝐚𝐠𝐚 (@yagaa__) September 7, 2023
Amazing, Unbelievable 💥🥳
Mass celebration is going on everywhere 🚩#Jawan pic.twitter.com/sMgTnpGpQa
#WATCH | Tamil Nadu | Fans offer milk to Shah Rukh Khan's poster and celebrate outside a theatre in Chennai, on the release of his film 'Jawan' pic.twitter.com/LWYtM1kPS3
— ANI (@ANI) September 7, 2023
संबंधित बातम्या