एक्स्प्लोर

Marathi Serial : प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल धमाका; आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार दोन नव्या मालिका

Marathi Serial : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' आणि 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या दोन नव्या मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Marathi Serial : मराठी मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून नव-नवे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीआरपीच्या शर्यतीत मागे पडल्याने गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नव्या मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. आजपासून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) आणि 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' (Chotya Bayochi Motthi Swapna) या दोन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक काय? 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नायिकेला म्हणजेच नेत्राला भविष्यात काय घडणार याचा अंदाज येत असतो. त्यामुळेच ती एक असामान्य मुलगी आहे. पण तरीही तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नेत्रा वर्तमानात आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत आहेत. तर ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारदेखील मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' या मालिकेचं कथानक काय? 

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकरने साकारली आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका गूढ रहस्यमय मालिका प्रेक्षकांना आजपासून  (12 सप्टेंबर) सोम-शनि. रात्री 10.30 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. तर 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' ही मालिका प्रेक्षक सोम-शनि. रात्री साडे आठ वाजता सोनी मराठीवर पाहू शकतात. 

मालिका : सातव्या मुलीची सातवी मुलगी
कुठे पाहू शकता? झी मराठी
किती वाजता? रात्री 10.30 वा. 

मालिका : छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? रात्री 8.30 वा. 

संबंधित बातम्या

Chotya Bayochi Motthi Swapna : 'इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ'; 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जे घडणार तेच ती बोलणार... ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget