(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood Actor : अभिनयाला केलं अलविदा अन् पाच वर्षांपासून शेतीत रमलाय अभिनेता; ग्लॅमरस जग सोडून शेतकरी होण्याचा निर्णय का घेतला?
Sarabhai vs Sarabhai Fame Became Farmer : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याने अभिनयक्षेत्राला रामराम करत शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अभिनेता नव्हे तर शेतकरी म्हणून तो काम करत आहे.
Sarabhai Vs Sarabhai Fame Became Farmer : अभिनयक्षेत्रात येण्याचं हजारो लोकांचं स्वप्न असतं. ग्लॅमरस जगाची सर्वांनाच भूरळ पडते. पण या जगात स्वत:ला सिद्ध करणं खूप अवघड आहे. अनेक कलाकारांनी (Bollywood Actor) आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. मनोरंजनसृष्टीत यशस्वी झालेल्या एका अभिनेत्याने मात्र या क्षेत्राला अलविदा केलं आहे आणि शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता पाच वर्षांपासून गावात शेती करत आहे.
ग्लॅमरस जग सोडून शेतकरी झालेल्या कलाकाराचं नाव राजेश कुमार (Rajesh Kumar) आहे. 'साराभाई वर्सेज साराभाई' (Sarabhai Vs Sarabhai) या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेतील रोशेसच्या माध्यमातून राजेश कुमारने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. 'साराभाई वर्सेज साराभाई' या मालिकेसह 'यम किसी से कम नहीं', 'नीली छतरी वाले','ये मेरी फॅमिली'सारख्या कार्यक्रमांतदेखील राजेश कुमारने काम केलं आहे. राजेश काही दिवसांपूर्वी 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या सिनेमात झळकला होता. पण त्याआधी पाच वर्षांपासून तो बिहारमध्ये शेती करत आहे.
पुढील पिढीसाठी मी काय करत आहे?
जॉइन फिल्म्सला दिलेल्या एका मुलाखतीत राजेश कुमार म्हणाला,"2017 मध्ये छोट्या पडद्यावर मी राज्य करत होतो. त्यावेळी मी शेती करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात सतत एक प्रश्न सतावत होता की,प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याव्यतिरिक्त पुढील पिढीसाठी मी काय करत आहे?".
'या' कारणाने घेतलेला अभिनयक्षेत्रातून ब्रेक
अभिनय क्षेत्र सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राजेश म्हणाला,"समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या विचाराने खरं तर मी शेती करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता असताना मी कोणतही सामाजिक काम करत नव्हतो. माझे मुलं मला कसे लक्षात ठेवतील? अभिनय करणं हा माझा स्वार्थ होता. पैसे कमावणं हा त्यामागचा हेतू होता. पण लोक मला लक्षात ठेवतील असं काम मी करत नव्हतो. त्यामुळे मी गावी जाऊन पुन्हा एकदा शेती करण्याचा निर्णय घेतला". शेती करताना अभिनेत्याने केला अडचणींचा सामना केला आहे.
राजेश कुमार आता पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात सक्रिय झाला आहे. यावर्षात ओटीटीवर रिलीज झालेल्या 'हड्डी' या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. याआधी तो मेरी फॅमिली, कोटा फॅक्ट्री सारख्या अनेक कलाकृतींचा भाग आहे.
राजेश कुमारचा जन्म 20 जानेवारी 1975 रोजी बिहारमधील पटनामध्ये झाला आहे. राजेशने आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात 2001 मध्ये प्रसारित झालेल्या 'के कुसुम: एक आम लडकी की कहानी' या मालिकेच्या माध्यमातून केली. त्यानंतर छोट्या पडद्यावर त्याचा प्रवास सुसाट सुटला. आज राजेश कुमारचा समावेश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांचा यादीत झाला आहे.
संबंधित बातम्या