एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?

Uttam Jankar : भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये पडत असल्याचा आरोप देखील उत्तम जानकर यांनी केलाय.

सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली. मात्र, आता उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलाय. मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला 64 हजार मते मिळाली होती. या वेळेला 54,000 मते मिळाली. मात्र मशीनमधील व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे. 

जानकर नेमके काय पुरावे देणार? 

ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही फेरफार होऊ शकत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच जानकर यांनी गंभीर आरोप केलाय. तसेच आपण पुराव्यानिशी सिद्ध करू, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जानकर नेमके काय पुरावे देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान

दरम्यान, माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मारकडवाडी येथे सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.

उत्तम जानकरांचा पोलिसांवर आरोप 

मारकडवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला असून प्रशासनाने मतदान प्रक्रियेला विरोध केला आहे. मात्र गावकरी मतदानावर ठाम असून मतदानासाठी पाच बूथ तयार करण्यात आलेले आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानासाठी मतदार यायला सुरुवात झाली मात्र अजूनही मतदान केंद्रात मतदानाची बॉक्स ठेवण्यात आलेले नाहीत. मतदान सुरू होताच हे बॉक्स पोलीस उचलून घेऊन जाणार आहेत, असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. आतापर्यंत मतदानाला केवळ 40 ते 50 नागरिक जमा झाले असून यात दहा ते बारा महिलांचा समावेश आहे. किमान 500 लोके जमल्यावर मतदान प्रक्रिया सुरू करणार असल्याचे जानकर यांचे म्हणणे आहे. आता हे मतदान नेमके कधी सुरु होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पोलिसांची प्रतिक्रिया

तर मारकडवाडी येथे पोलिसांच्या दबावामुळे मतदार बाहेर येत नसल्याचा आरोप धादांत खोटा असून आम्ही फक्त कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी येथे आलेलो आहोत. मतदान प्रक्रिया सुरू केल्यावर आम्ही मतदानाचे बॉक्स उचलून नेणार असल्याचे आरोपही खोटे असल्याची भूमिका डीवायएसपी शिरगावकर यांनी माझाशी बोलताना मांडली.  ही मतदान प्रक्रिया झाल्यानंतर नियमानुसार गुन्हे दाखल केले जातील मात्र ही प्रक्रिया सुरू होऊ नये यासाठी आमचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.  मारकडवाडी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असला तरी बंदोबस्त मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत थांबविण्यात आलेला आहे. 

आणखी वाचा 

EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
Embed widget