एक्स्प्लोर

Bollywood Actor : तीन लफडी आणि दोन लग्न करूनही 'हा' अभिनेता एकटाच राहिला; चित्रपट मात्र सुपरहिट दिले!

Bollywood Actor Pawan Singh : बॉलिवूड अभिनेता पवन सिंहने आपल्या अभिनयाने भोजपुरी इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. पण तीन अफेअर आणि दोन वेळा संसार थाटलेला अभिनेता आजही सिंगल आयुष्य जगत आहे.

Bollywood Actor : अभिनेते त्यांच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर चाहत्यांचं लक्ष असतं. आज सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व्यावसायिक पातळीवर यशस्वी झाले असले तरी वैयक्तिक  आयुष्यात मात्र ते यशस्वी झालेले नाहीत. भोजपुरी इंडस्ट्रीत नाव कमावलेला अभिनेता पवन सिंह (Pawan Singh) तीन अफेअर आणि दोन वेळा संसार थाटूनही आज सिंगल आयुष्य जगत आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता आणि गायक पवन सिंहचा समावेश आहे. भोजपुरी इंडस्ट्रीसह भारतभर पवन सिहंची लोकप्रियता पसरली आहे. 'ओढनिया वाली', 'लॉलीपॉप लागेलू' सारख्या अनेक लोकप्रिय भोजपुरी आयटम नंबरमध्ये तो झळकला आहे. भोजपुरी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सिनेमे देणाऱ्या पवन सिंहचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूपच फिल्मी आहे. 

पवन सिंहचं लव्ह लाईफ जाणून घ्या... 

पवन सिंहचं नाव अनेक भोजपुरी अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. यात भोजपुरी इंडस्ट्रीतील रानी चॅटर्जीपासून मोनालिसा ते अक्षरा सिंहपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. 'देवरा बडा सतावेडा' या सिनेमापासून त्याचं नाव मोनालिसासोबत जोडलं गेलं आहे. मोनालिसानंतर त्याने रानी चॅटर्जीला डेट केल्याचं म्हटलं जातं. कोणत्याच अभिनेत्रीसोबत पवन सिंहचं रिलेशन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकलेलं नाही. अभिनेत्रीने त्याच्यावर छळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

अक्षरा सिंहनेदेखील लावलेत आरोप

मीडिया रिपोर्टनुसार, पवन सिंह काही दिवस भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहसोबतची रिलेशनमध्ये होता. दोघांच्या डेटींगच्या चर्चा ते ब्रेकअपच्या बातम्या चांगल्याच व्हायरल झाल्या. दोघे लिव्ह-इन रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जातं. अक्षराने पवन सिंहवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. ज्योती सिंहसोबत तो गुपचुप लग्नबंधनात अडकला. ज्योतीसोबत लग्न झालेलं असतानाच तो अक्षरासोबत रिलेशनमध्ये होता. अक्षरानेदेखील पवनवर मारहाणीचा आरोप लावला होता.

दोन्ही संसार तुटले...

पवन सिंहचं पहिलं लग्न नीलम सिंह नामक एका मुलीसोबत 2014 मध्ये झालं होतं. 2015 मध्ये नीलमने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यानंतर पवन 2018 मध्ये ज्योती सिंहसोबत लग्नबंधनात अडकला. पुढे पवन आणि ज्योतीदेखील विभक्त झाले. 

पवन सिंहचं नेटवर्थ किती? (Pawan Singh Net Worth)

पवन सिंहचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयासह तो गाण्यांमधूनदेखील चांगलीच कमाई करतो. रिपोर्टनुसार, पवन सिंहची एकूण संपत्ती 50-65 कोटींच्या आसपास आहे. पवन सिंह एका सिनेमासाठी 40-50 लाख रुपये चार्ज करतो. तर एका गाण्यासाठी तो 2-3 लाख रुपयांचं मानधन घेतो. एकंदरीतच वर्षाला तो 3-5 कोटींची कमाई करतो. महागड्या गाड्यांचीदेखील पवनला आवड आहे.

संबंधित बातम्या

Pawan Singh: भर कार्यक्रमामध्ये पवन सिंहला फेकून मारला दगड; अभिनेता भडकला, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget