![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sara Ali Khan Boyfriend : केदारनाथमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरतेय सारा अली खान, कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा? फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Who Is Arjun Pratap Bajwa : सारा अली खान रुमर्ड बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवासोबत केदारनाथमध्ये फिरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
![Sara Ali Khan Boyfriend : केदारनाथमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरतेय सारा अली खान, कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा? फोटो सोशल मीडियावर व्हायरल sara ali khan Rumoured Boyfriend Who is Arjun pratap bajwa bollywood actress Spotted in kedarnath with BJP Leader Son marathi news Sara Ali Khan Boyfriend : केदारनाथमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरतेय सारा अली खान, कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा? फोटो सोशल मीडियावर व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/01/205fcb9098597d0738ba344d1f9c6b5a1730447737495322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sara Ali Khan Spotted With Boyfriend : अभिनेत्री सारा अली खान सध्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून केदारनाथमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या केदारनाथ ट्रिपचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहताचा चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सारा अली खान केदारनाथ फिरायला तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांचे फोटोही समोर आले आहेत. इतकंच नाही तर साराचा रुमर्ड बॉयफ्रेंड दिग्गज भाजप नेत्याचा मुलगा आहे.
केदारनाथमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरतेय सारा अली खान
सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या केदारनाथमध्ये (Kedarnath) सहलीला गेली आहे. केदारनाथ ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहे. साराच्या नव्या फोटोंनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. सारा अली खान तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत या ट्रिपला गेल्याचं बोललं जात आहे. सारा अली खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवा याच्यासोबतची तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या दोघांचा दर्शन घेतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सध्या सोशल मीडियावर सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. सारासोबत फोटो व्हायरल झालेला तरुण नेमका कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. फोटोमध्ये दिसणारा तरुण अर्जुन प्रताप बाजवा हा साराचा बॉयफ्रेंड असल्याची अफवा आहे. रेडिटवर सध्या सारा आणि अर्जुनचा एक फोटोर व्हायरल होत आहे. यामध्ये सारा अली खान आणि तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवा केदारनाथमधील भीमशिलाला भेट देत तिथे दर्शन घेताना दिसत आहेत.
कोण आहे अर्जुन प्रताप बाजवा?
सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला नाही. पण, हा फोटो समोर आल्यानंतर, दोघे एकत्र दिसल्याने ते नक्कीच एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज सोशल मीडिया युजर्स लावत आहेत. अर्जुन प्रताप बाजवा हे दिग्गज राजकारणी फतेह जंग सिंह बाजवा यांचा मुलगा आहेत. फतेह जंग सिंह बाजवा सध्या पंजाबमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आहेत. सारा आणि अर्जुनच्या फोटोमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : हार्दिक पांड्याच्या EX वाइफचा दिशा पाटनीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमान्स, नताशाचा दिवाळी पार्टीतील व्हिडीओ व्हायरल होताच चाहते भडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)