एक्स्प्लोर
'संजू' 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट
संजू चित्रपटाने पहिल्याच दिवशी 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' चित्रपटाला 2018 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.
2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'संजू'ने सलमान खानचा 'रेस 3', टायगर श्रॉफचा 'बागी 2' आणि दीपिका-रणवीरच्या 'पद्मावत' या चित्रपटांना मागे टाकलं.
संजय दत्तच्या बायोपिकचा मच अवेटेड टिझर रिलीज
सलमान खानच्या 'रेस-3' ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, 'बागी-2' ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर 'पद्मावत' (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर 'वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे.नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'बाहुबली' (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे.TOP 5 - 2018 Opening Day biz... 1. #Sanju ₹ 34.75 cr 2. #Race3 ₹ 29.17 cr 3. #Baaghi2 ₹ 25.10 cr 4. #Padmaavat ₹ 19 cr [Thu release; incl Wed previews ₹ 24 cr] 5. #VeereDiWedding ₹ 10.70 cr India biz. [Hollywood films not included]
— taran adarsh (@taran_adarsh) June 30, 2018
मनिषा नर्गिस दत्त, तर दिया मान्यता साकारणार; सलमानच्या भूमिकेत कोण?
रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.'संजू' चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली असून प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. REVIEW : संजू : आयुष्यभराचा धडाRanbir Kapoor - Opening Day biz... 1. #Sanju ₹ 34.75 cr 2. #Besharam ₹ 21.56 cr 3. #YJHD ₹ 19.45 cr 4. #ADHM ₹ 13.30 cr 5. #Tamasha ₹ 10.94 cr India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement