एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळवीट शिकारप्रकरण: सलमान खानचा फैसला 17 जुलैला!
बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्याने, या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
जयपूर: काळवीट शिकारप्रकरणी दोषी सलमान खानला सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविरोधात आता जोधपूर सत्र न्यायालयात 17 जुलैला सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज स्वत: सलमान खान कोर्टात हजर राहिला.
मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्याने, या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सलमानने काळवीट शिकारप्रकरणात झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिलं आहे.
आजच्या सुनावणीसाठी सलमान कालच जोधपूरकडे रवाना झाला होता.
जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीटांच्या शिकार प्रकरणी 5 एप्रिल रोजी सलमानला दोषी ठरवलं होतं. त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन रात्री तुरुंगात घालवल्यानंतर सलमान तिसऱ्या दिवशी जामीनावर बाहेर आला.
दरम्यान, सलमान रविवारी 1.30 च्या सुमारास जोधपूरला पोहोचला. सलमानसोबत त्याचे मित्र काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी, बहिण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा होते.
मागील सुनावणीत सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिताही उपस्थित होत्या.
सलमानला दोन अटींवर जामीन
सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
सलमानला 5 वर्षांची शिक्षा
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं. शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
संबंधित बातम्या
काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
सलमान खानच्या परदेशवारीला कोर्टाकडून हिरवा कंदील
सलमानसाठी एक न्याय, अन् इतर कैद्यांना वेगळा न्याय!
सलमान न जेवता रात्रभर जमिनीवर झोपला
निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!
...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!
काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement