एक्स्प्लोर
'मेरा नाम है सिकंदर...'रेस 3'चं पहिलं पोस्टर रिलीज
दरम्यान, दिग्दर्शक रेमो डिसूजाचा 'रेस 3' यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमानशिवाय चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेझी शाह आणि साकिब सलीम हे कलाकारही दिसणार आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. सलमानचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'रेस 3' चं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. स्वत: सलमानने ट्विटरवर हे पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये सलमान अॅक्शन अंदाजात फारच स्टायलिश दिसत आहे.
"या आठवड्यात 'रेस 3' च्या कुटुंबाची ओळख करुन देतो....माझं नाव आहे सिकंदर. सेल्फलेस ओव्हर सेल्फीश," असं ट्वीट सलमान खानने केलं आहे. या संपूर्ण आठवड्यात सिनेमाशी संबंधित इतर कलाकारांचेही पोस्टर समोर येतील, असं या ट्वीटमुळे दिसत आहे.
सलमान सध्या अबुधाबीमध्ये 'रेस 3'चं शूटिंग करत आहे. या सिनेमासाठी त्याने एक रोमँटिक गाणंही लिहिल्याचं म्हटलं जात आहे. सलमानने हे गाणं ऐकवल्यानंतर सगळ्यांना आवडलं. विशाल मिश्राने या गाण्याला संगीत दिलं आहे. त्यामुळे क्रेडिट लिस्टमध्ये सलमानचं नाव गीतकार लिहिलं जाण्याची ही पहिली वेळ असेल. दरम्यान, दिग्दर्शक रेमो डिसूजाचा 'रेस 3' यंदा ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमानशिवाय चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेझी शाह आणि साकिब सलीम हे कलाकारही दिसणार आहेत.Is hafte milata hoon #Race3 ki family se ... mera naam hai Sikander. Selfless over selfish . #Race3ThisEid @tipsofficial @SKFilmsOfficial pic.twitter.com/FAP4FAQkoc
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement