Salman Khan Home Rent : सलमान खानच्या घराचं भाडं तब्बल एक कोटी रुपये!
Salman Khan : सलमान खानच्या घराचं भाडं एक कोटी रुपये आहे.
Salman Khan Rent Santacruz Commercial Property : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत असला तरी सांताक्रूझमध्येही त्याचं एक घर आहे. हे घर आता त्याने भाड्याने दिले आहे. भाईजानच्या या घराचं भाडं तब्बल एक कोटी रुपये आहे.
सलमानला महिन्याला मिळत होते एक कोटी रुपये
सलमान खानने मुंबईतील सांताक्रूझ परिसरात एक चार मजली इमारत खरेदी केली आहे. 2012 मध्ये त्याने तब्बल 120 रुपयांत ही इमारत खरेदी केली आहे. सलमानच्या वडिलांनी ही इमारत रिटेल चेन फूड हॉलला भाड्याने दिली आहे. या इमारतीचं वर्षभराचं भाडं 89.60 लाख रुपये आहे. त्यासाठी कंपनीने 2.40 कोटी रुपये डिपॉजिट दिले होते.
पाच वर्षांसाठीचा हा करार पुढे दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला. त्यामुळे वर्षाचं भाडं हे वाढवून 94.01 लाख रुपये करण्यात आले. पण पुढे कंपनीने वेळेत भाडे न दिल्याने भाईजानने हा करार रद्द केला. या इमारतीतील एका घराचं भाडं तब्बल एक कोटी रुपये आहे. त्यामुळे भाईजानला दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत आहेत. आता एका व्यक्तीने भाईजानचं हे घर भाड्याने घेतलं आहे. तो दर महिन्याला एक कोटी रुपये भाडं देतो.
सलमानने 'बीबी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. भाईजान वर्षाला 220 कोटींची कमाई करतो. तर महिन्याला 16 कोटी रुपये कमावतो. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानची गणना होते. एका सिनेमासाठी भाईजान 100 कोटींपेक्षा अधिक मानधन घेतो.
भाईजानच्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घ्या... (Know Salman Khan Property)
सलमान खान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. मुंबईत पाच कोटी रुपयांच्या आसपास त्याची प्रॉपर्टी आहे. सांताक्रूझ येथेही त्याने चार मजली इमारत विकत घेतली आहे. पण ही इमारत अभिनेत्याने भाड्याने दिली आहे. पनवेलमध्येही त्याचं फार्महाऊस आहे.
सलमान खानच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Salman Khan Upcoming Movies)
सलमान खानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात तो कतरिना कैफ आणि इमरान हाशमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'टायगर 3' हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखचीदेखील (Shah Rukh Khan) झलक दिसणार आहे. मनीष शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या