आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती.
धाराशिव : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील तपासाला गती आली असून सीआयटी व एसआयटी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्याअनुषंगाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून बीडचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता, विरोधकांना राजकारण करायचं आहे, त्यांनी राजकारण करावं असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. तर, धनंजय मुंडेंनीही (Dhanajay Munde) याप्रकरणाशी माझा संबंध नाही, राजीनाम्याच्या मागणीला काही अर्थ नाही, असे म्हटले होते. आता, राज्य सरकारमधील नेतेही यावर भाष्य करत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता फडणवीसांचे खास आमदार असलेल्या अभिमन्यू पवार यांनीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेटही घेतली होती. त्यामुळे, यासंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. वाल्मीक कराड यांच्याशी असलेली धनंजय मुंडेंची जवळीक आणि नैतिक जबाबदारी यावर अभिमन्यू पवार यांचं मत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा, असे उत्तर पवार यांनी दिले. तुळजापूर येथे नवसपूर्ती यात्रेसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक, तसेच पवनचक्की वादातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या. याप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही सापडले जात नाहीत. वाल्मिक कराड सीआडीकडे शरण आला असला तरी धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी नैतिकतेचा विचार ज्याने त्यांनी करावा असे म्हणत धनंजय मुंडेंना सल्ला दिला आहे. त्यांना मी सांगण्याची गरज काय, याशिवाय कार्यकर्ते काय करतात हे नेत्याला माहित नसतं, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी सरकारकडून एसआयटी नेमण्यात आली असून या एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही म्हटले आहे.
हेही वाचा
रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन