Salman Khan Photo : सर्पदंशानंतरचा दबंग खानचा रुग्णालयातील फोटो आला समोर
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसजवळ सापाने दंश केला असून त्याला आता रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Salman Khan First Photo From the Hospital : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सापाने दंश केला असून त्याला आता रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सलमानला नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजता सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले. दरम्यान सापाने दंश केल्यानंतरचा सलमानचा रुग्णालयातील फोटो समोर आला आहे.
या फोटोमध्ये सलमान खान रुग्णालयातील बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याने डोळे बंद केले आहेत आणि तो शांतपणे झोपला आहे. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले आहे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सलमानवर तातडीने उपचार केले. सलमान खान उद्या त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
सलीम खान म्हणाली, लमान रात्री त्याच्या खोलीत होता आणि अचानक त्याचा हात दुखू लागला. त्यानंतर त्याला सापाने दंश केला असल्याचे समोर आले. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले आहे. साप सलमानच्या खोलीत कसा गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.
पनवेल येथील फार्म हाऊसवर होता सलमान
सापाने दंश केला तेव्हा सलमान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर होता. नाताळची सुट्टी आणि सोमवारी 27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर होते. सध्या सलमान पनवेलच्या फार्महाऊसवर विश्रांती घेत आहे.
पाहा व्हिडिओ : अभिनेता सलमान खानला सर्पदंश, साप बिनविषारी असल्यानं अनर्थ टळला
संबंधित बातम्या