Vicky Kaushal-Katrina Kaif First Christmas : विकी - कतरिनाने साजरा केला लग्नानंतरचा पहिला नाताळ सण
Vicky Kaushal-Katrina Kaif First Christmas : कतरिनाने लग्नानंतरचा पहिला नाताळ सण दिमाखात साजरा केला आहे. तसेच तिने विकी सोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे.
Vicky Kaushal-Katrina Kaif First Christmas : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. विकी कामानिमित्ताने मुंबईबाहेर होता. पण नाताळचा सण खास बनवण्यासाठी तो मुंबईत परतला. कतरिना आणि विकीने लग्नानंतरचा पहिला नाताळ सण दिमाखात साजरा केला आहे.
विकी मुंबई विमानतळावर शनिवारी स्पॉट झाला होता. कतरिनाने विकी सोबतचा एक रोमॅंटिक फोटोदेखील शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अर्जुन कपूरलादेखील कतरिना आणि विकीचा हा सुंदर फोटो आवडला आहे. फोटोवर कमेंट करत अर्जुनने लिहिले आहे,"जे बात".
View this post on Instagram
लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. त्यानंतर लगेचच दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण नाताळच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील रॉयल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतले. मेहंदी, हळदी, संगीत, लग्न अशा सर्व समारंभांना कतरिना आणि विकीच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. पण दोघांच्या या शाही विवाह सोहळ्यात एकाही बॉलिवूड सेलिब्रिटीची उपस्थिती नव्हती.
कोरोनामुळे दोघांनीही अगदी जवळच्या लोकांना लग्न समारंभासाठी आमंत्रित केले होते. पण आता दोघेही बॉलीवूडमधील त्यांच्या सर्व मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित बातम्या
Ranveer Singh 83 Preparation : Kapil Dev ची भूमिका साकारायला Ranveer Singh ला लागला 6 महिन्यांचा कालावधी
सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती
Maharashtracha Favourite Kon : आज रंगणार 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळा, सूत्रसंचालनाचा लगाम मांजरेकरांच्या हाती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha