(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan Sister Divorced : तुला घटस्फोट हवाय? सलमान खानच्या बहिणीला नवऱ्याचा सवाल; म्हणाला 'मी त्यानंतर...'
Aayush Sharma and Arpita Sharma : सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. यावर आयुषची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Aayush Sharma and Arpita Sharma : आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि सलमान खानची (Salman Khan) बहिण अर्पिता खानचं (Arpita Sharma) नोव्हेंबर 2014 मध्ये लग्न झालं. त्यानंतर त्यांच्या सुखी संसाराला देखील सुरुवात झाली आणि आजही त्यांच्यातलं प्रेम अनेकदा पाहायला मिळतं. या दोघांना दोन मुलंही आहेत. अनेकदा सलमानची लाडकी बहिण अर्पिता ही अनेक कारणांमुळे ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता अर्पिताच्या घटस्फोटाच्या चर्चांना बरंच उधाण आल्याचं चित्र आहे. पण यावर आयुषने दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असल्याचं पाहायला मिळतंय.
सगळं सुरुळीत असतानाच 2019 मध्ये अचानक त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यावर आयुषने न्यूज 18शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अर्पिता आणि आयुषच्या घटस्फोटांच्या चर्चांना आयुषनेच पूर्वविराम दिल्याचं पाहायला मिळतंय.
आयुषने काय म्हटलं?
आयुषने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करताना म्हटलं की, माझ्या आयुष्यात इतर कोणालाही इतका रस नाही की ते अशा अफवा पसरवतील. पण याचसंदर्भात मला एक किस्सा आठवतोय. मी माझ्या मुलाला डोसा खायला घेऊन गेलो होतो. आम्ही जेव्हा परत येत होतो, तेव्हा पापाराझींनी आम्हाला घेरलं. त्यावेळी त्यांनी मला अर्पितासोबत घटस्फोट घेणार का असा सवाल विचारला. हा प्रश्न ऐकून सुरुवातीला मला धक्काच बसला. त्यानंतर मी घरी येऊन अर्पिताला विचारलं की तू माझ्यापासून घटस्फोट घेणार आहे का? त्यानंतर आम्ही दोघेही खूप हसलो.
View this post on Instagram
अर्पिता माझी सपोर्ट सिस्टम
आयुषने सांगितलं की, माझी बायको अर्पिता ही माझी सपोर्ट सिस्टम आहे. ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे. अर्पिताचे सिनेमांना घेऊन वेगळे विचार आहेत. तिला छोटे आणि भावनिक सिनेमे आवडतात. आयुषने लवयात्री या सिनेमातून इंडस्ट्रीमधील त्याचं पदार्पण केलं.
View this post on Instagram