एक्स्प्लोर
अवॉर्ड शोदरम्यान सलमानने चाहत्याचा फोन फोडला!
तेव्हा सलमान भडकला आणि फॅनकडून फोन घेऊन जमिनीवर जोरात आपटला.
मुंबई : अभिनेता सलमान खान त्याच्या दबंग अंदाजासाठी ओळखला जातो. नुकत्याच एका कार्यक्रमात असं काही घडलं जे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
एका अवॉर्ड शोदरम्यान, सलमान खान आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत बोलत होता. त्याचवेळी एक चाहता सलमानजवळ आला आणि त्याचा अनब्रेकेबल फोन दाखवू लागला. हा फोन कधीही तुटणार नाही, असा त्याचा दावा होता.
त्याच्याकडे दुर्लक्ष करत सलमान पुन्हा आपल्या मित्रांशी पुन्हा बोलू लागला. पण तो चाहता थांबला नाही आणि त्याच्या फोनचे फीचर्स दाखवू लागला.
तेव्हा सलमान भडकला आणि फॅनकडून फोन घेऊन जमिनीवर जोरात आपटला. पण फोन तुटला नाही. सलमानने पुन्हा एकदा फोन फेकला तरीही फोन तुटला नाही. सलमानने असं करताना पाहून तिथे गर्दी जमा झाली आणि सलमानला फोन तोडण्यासाठी चीअर करु लागली.
अनेक प्रयत्नांनंतर फोन तुटला. सलमानने फोनचे तुकडे उचलले आणि फॅनला म्हणाला, अनब्रेकेबल? यानंतर तिथे उपस्थित लोक हसू लागले. त्या चाहत्यालाही सलमानसमोर शो ऑफ केल्याचा पश्चात्ताप झाला असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement