प्रभास विरुद्ध सैफ सामना रंगणार, आदिपुरुष सिनेमात रावणाची भूमिका ठरली
महाकाव्य रामायणावर हा चित्रपट बेतला आहे. राम एकदा निश्चित झाल्यानंतर रावणाची भूमिका कोण करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. पण आज प्रभासने इन्स्टावर हे गुपित फोडलं.
मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत याने काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी आदिपुरूष सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रभासच्या वाढदिवशी या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं होतं त्यात प्रभास रामाच्या अवतारात असणार हे नक्की होतं. महाकाव्य रामायणावर हा चित्रपट बेतला आहे. राम एकदा निश्चित झाल्यानंतर रावणाची भूमिका कोण करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. पण आज प्रभासने इन्स्टावर हे गुपित फोडलं.
आदिपुरूष हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. या चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानची निवड झाली आहे. प्रभासने शेअर केलेल्या पोस्टरवर लंकेश असं नमूद करण्यात आलं आहे. तर या पोस्टरवर सैफ अलीचं नाव आहे. ओम राऊत आणि सैफ हे समीकरण तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमातून पाहायला मिळालं होतं. या सिनेमातही त्याने तान्हाजी मालुसरे यांच्यासमोर उभा ठाकलेला उदयभान रंगवला होता. या चित्रपटाला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ओम आणि सैफची हीच केमिस्ट्री आगामी आदिपुरुषमध्येही पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाबद्दल अद्याप फार काही वाच्यता होत नसून हा एक मोठा प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातंय. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगु, इंग्रजी आदी भाषांमध्येही बनणार आहे. या चित्रपटाचं बजेटही साडेतीनशे कोटी असल्याचं कळतं. ओम राऊत या चित्रपटाचा निर्माताही बनला आहे. त्याच्यासोबत प्रसाद सुतार हा व्हिएफएक्सचा बादशाहही निर्माता होतो आहे.
संबंधित बातम्या :