(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रभास आणि ओम राऊत आले एकत्र, साडेतीनशे कोटींच्या आदीपुरुषची घोषणा
चित्रपटाचं पोस्टर चित्तवेधक आहे. पोस्टर पाहिल्यावर रामायणासारखा फील येतो. यात धनुर्धारी अशी एक एमेज आहे. शिवाय, हनुमानाचा चेहराही यात दर्शवण्यात आला आहे.
मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत हे नाव आता संपूर्ण भारताला परिचित झालं आहे. 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाद्वारे ओमने हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्याच्या चित्रपटाला अमाप यश लाभलं. त्याच्या कामाची दखल घेऊन टी सीरीज कंपनीने ओमसोबत आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे 'आदिपुरुष'. या चित्रपटाचा नायक असणार आहे मेगास्टार प्रभास. या चित्रपटाची पहिली झलक आज सकाळी सोशल मिडियावर प्रभासने टाकली.
चित्रपटाचं पोस्टर चित्तवेधक आहे. पोस्टर पाहिल्यावर रामायणासारखा फील येतो. यात धनुर्धारी अशी एक एमेज आहे. शिवाय, हनुमानाचा चेहराही यात दर्शवण्यात आला आहे. तर रावणासारखी आक्राळविक्राळ तोंडंही यता दिसतात. पण हा प्रकार नेमका काय आहे ते मात्र कळलेलं नाही. चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय असं त्याचं साधारण स्वरुप असणार आहे. या चित्रपटाचं बजेट तब्बल साडेतीनशे कोटी असणार आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाचा ओम राऊत दिग्दर्शक तर आहेच, पण तो निर्माताही असणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटाचा निर्माता प्रसाद सुतारही असणार आहे. हे महाकाव्यावर आधारित असलेली कलाकृती असल्यामुळे ओम रामायणच करतोय अशी चर्चा आहे. याबद्दल बोलताना ओम म्हणाला, हा खरंतर ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रभास या प्रोजेक्टसाठी तयार झाला त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.
हा चित्रपटाचं शूट 2021 मध्ये सुरू होणार आहे. तर 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल