एक्स्प्लोर
तैमूरचं नाव बदलण्याचा विचार : सैफ अली खान
![तैमूरचं नाव बदलण्याचा विचार : सैफ अली खान Saif Ali Khan Considered Changing Taimurs Name तैमूरचं नाव बदलण्याचा विचार : सैफ अली खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/23101804/Kareena-Kapoor-Saif-Taimur-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरच्या नावावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आपण तैमूरचं नाव बदलण्याचा विचार केला होता, असं सैफने कबूल केलं आहे.
शाळेत तैमूरचं नाव उगाच सगळ्यांच्या तोंडी बसावं, अशी माझी इच्छा नव्हती. आपण तैमूरचं नाव बदलण्याची तयारीही केली, मात्र करिना त्यासाठी राजी नव्हती, त्यामुळे ऐनवेळी विचार बदलल्याचं सैफने सांगितलं.
करिनाने 20 डिसेंबर रोजी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर क्रूरकर्मा तिमूर राजाच्या नावावरुन बाळाचं नाव ठेवल्यामुळे सोशल मीडियात सैफ-करिनावर टीकेची झोड उठली होती.
'लोकांच्या मनात तुझ्याविषयी आदर आहे.. आणि तू तुझ्या मतांवर ठाम रहायला हवंस' असं करिनाने आपल्याला समजावल्याचंही सैफ सांगतो. मात्र लोकांसाठी नाही, तर त्याला शाळेत कोणी चिडवू नये, म्हणून मला त्याचं नाव बदलायचं होतं, असं सैफचं म्हणणं आहे.
अजूनही मी त्याचं नाव बदलायचा विचार करत आहे, हे डोक्यात आहे, बघू काय होतंय, असं सैफ म्हणतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)