"तो मी नव्हेच", सैफवर हल्ला करणारा खरा आरोपी भलताच? CCTV मध्ये दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार
Saif Ali Khan Stabbing Case : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटकेत असलेला आरोपी मोहम्मद शहजादला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Saif Ali Khan Attack Case : अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरुन त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आला. 16 जानेवारीला मध्यरात्री ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर आरोपीला पकडण्यात यश मिळवलं. आता आरोपी मोहम्मद शहजादचं म्हणणं आहे की, सैफवर हल्ला करणार तो मी नव्हेच. आरोपीच्या कुटुंबियांनीही हाच दावा केला आहे. यानंतर आता पोलिस फेस रेकिग्नेशनची मदत घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आरोपी मोहम्मद शहजादला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
'आरोपीनेच हा गुन्हा केल्याचा कोणताही पुरावा नाही'
आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे की, 'आरोपीनेच हा गुन्हा केल्याचा कोणताही पुरावा नाही. आरोपी दोषी असल्याचा कोणनाही पुरावा तपास यंत्रणेने सादर केलेला नाही. सीसीटीव्ही आणि अटकेतील आरोपीमध्ये साम्य नाही'. ते पुढे म्हणाले की, 'अटक केल्यावर नातेवाईकांना कळवलं नाही. आरोपीशी बोलणं झालं, तो खूप घाबरलेला आहे. आरोपीने म्हटलं आहे की, "सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी मी नाही, मला फसवलं जात आहे".
सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी मोहम्मद नसल्याचा दावा
दरम्यान, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजाद दोषी नसल्याचं त्याच्या कुटुंबाचं म्हणणे आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी मोहम्मद शहजाद नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात त्यांचा मुलगा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्याशी फेस रेकग्निशन करणार, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपीचं उपरणे आणि कपडे जप्त करण्यात आले असून बूट शोधत असल्याचं तपास सैफ अली खान प्रकरणातील बातम्या
मुंबई पोलिस तपासासाठी कोलकाताला जाणार
मुंबई पोलिस कोलकाता येथील रहिवासी खुखमोनी जहांगीर शेख याचा जबाब नोंदवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादने जहांगीर शेखच्या आधार कार्डचा वापर करून कोलकातामध्ये सिम कार्ड खरेदी केलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
16 जानेवारी रोजी मध्यरात्री, वांद्रे परिसरातील सद्गुरु शरण अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर असलेल्या त्याच्या राहत्या घरात घुसून चोरट्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने त्याच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या सैफ अली खानला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 21 जानेवारीला संध्याकाळी अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :