Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, 29 जानेवारीपर्यंत कस्टडी
Saif Ali Khan Stabbed : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद याला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Saif Ali Khan Knife Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 19 जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 24 जानेवारीला आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यानंतर त्याला आणखी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
न्यायालयाने पोलिसांनी आरोपीच्या कोठडीत मुदतवाढ हवी आहे का, याबद्दल विचारले. यावर युक्तीवाद करताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा टॉवेल जप्त केला आहे, कपडे जप्त केले आहेत. त्याचे बूट शोधायचे आहेत, पण ते सापडलेले नाहीत. मिळालेल्या सीसीटीव्हीची एफएसएलकडून फेस रेकग्निशन चाचणी घ्यावी लागेल. यासाठी आम्हाला 7 दिवसांच्या कोठडीची आवश्यकता आहे. यानंतर आरोपी आणि वकिल दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
फॉरेन्सिक तपासणीत काय उघड?
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपींचे बोटांचे ठसे सैफच्या घरातून सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळत असल्याचं फॉरेन्सिक तपासणीत उघड झालं आहे. फॉरेन्सिक तपासणीदरम्यान, अटक केलेल्या आरोपींच्या बोटांच्या ठशांसह, सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुलच्या बोटांचे ठसे सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीच्या दारावर, बाथरूमच्या दारावर आणि पाईपलाईनवर आढळून आल्याचे उघड झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या वांद्रे पोलिसांसाठी हा एक महत्त्वाचा पुरावा आहे, ज्याच्या आधारे पोलिस पथक न्यायालयात हे सिद्ध करू शकेल की, अटक केलेला आरोपी हाच हल्ल्याच्या दिवशी सैफ अलीच्या घरात होता.
मुंबई पोलिसांना सैफचा जबाब नोंदवला
याप्रकरणात मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी 24 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या घरी जाऊन त्याचा जबाब नोंदवला आहे. 16 जानेवारीला सैफ अली खानवर जीवघेणा चाकूहल्ला झाला होता, त्यानंतर मध्यरात्री जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 21 जानेवारीला सैफला रुग्णालयातू डिस्चार्ज मिळाला.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :