(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandramukhi 2 : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम आर्या आंबेकर अन् कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2'चं खास कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?
'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमातील एक गाणं लोकप्रिय गायिका आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) गायलं आहे.
Aarya Ambekar Sung Special Song Of Kangana Ranaut Chandramukhi 2 Movie : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कंगनाचा रौद्र अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता या सिनेमातील एक गाणं 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) गायलं असल्याचं समोर आलं आहे.
'चंद्रमुखी 2' या सिनेमातील एक गाणं आर्याने गायलं असून सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'चंद्रमुखी 2' सिनेमातील 'स्वागाथांजली' या गाण्याचं हिंदी व्हर्जन आर्याने गायलं आहे. हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं असून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेचं कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
आर्या आंबेकरची पोस्ट काय? (Aarya Ambekar Post)
आर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'चंद्रमुखी 2' सिनेमातील गाणं गायलं असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने लिहिलं आहे,"तुम्हाला कधी आश्चर्याचा धक्का बसला आहे का? काही दिवसांपूर्वी मला एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. 'चंद्रमुखी 2' आणि 'ऑस्कर' विजेत्या 'नाटू नाटू' या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार एमएस किरावनी यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2' या बहुचर्चित सिनेमातील 'स्वागाथांजली' (Swagathaanjali) या गाण्याचं हिंदी व्हर्जन गाण्याची संधी मला मिळाली आहे".
आर्या आंबेकरने पुढे लिहिलं आहे,"वैभव जोशी दादाने या गाण्याचे बोल खूप छान पद्धतीने लिहिले आहेत. त्यामुळे आता मी फक्त कृतज्ञता व्यक्त करते. गणपती बाप्पा मोरया...माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्वांचेच आभार. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की पाहा".
अमृता खानविलकरच्या कमेंटने वेधलं लक्ष
आर्या आंबेकरच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'पासून सुरू झालेला आर्याचा प्रवास आता बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद होत आहे. या सगळ्यात अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) एका कमेंटने मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने लिहिलं आहे,"तर तू दोन चंद्रमुखींसाठी गाणं गायलं आहेस". त्यावर कमेंट करत आर्याने लिहिलं आहे,"तुझ्याकडून कौतुक होत आहे यावर विश्वास बसत नाही".
संबंधित बातम्या