एक्स्प्लोर

Chandramukhi 2 : कंगनाचा 'चंद्रमुखी 2'कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Chandramukhi 2 Movie Review : सिनेसृष्टी बहरली आहे. एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे 'जवान' (Jawan) सिनेमा धमाका करत असताना 'फुकरे 3' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' हे सिनेमेदेखील प्रदर्शित झाले आहे. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'चंद्रमुखी' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

'चंद्रमुखी 2'चं कथानक काय आहे? (Kangana Ranaut Chandramukhi 2 Movie Story)

'चंद्रमुखी 2' या सिनेमाचं कथानक एका श्रीमंत कुटुंबाभोवती फिरणारं आहे. काही कारणाने पूजा करण्यासाठी हे श्रीमंत कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरी येतं. पण नकळक चंद्रमुखी आणि वैटियन राजा पुन्हा जागे होतात. आता चंद्रमुखी आणि वैटियन राजा आमने-सामने आल्याने आता पुढे काय होणार हे प्रेक्षकांना सिनेमातच पाहावं लागेल. विनोद आणि भय असणारा हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात सिनेरसिकांना एक साम्य दिसेल.

कंगनाचा रौद्र अवतार

'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राघव लॉरेंस (Raghav Lowrence) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात राघवने वैत्तियन राजाची भूमिका साकारली आहे. तर 'पंगाक्वीन' कंगना रनौत 'चंद्रमुखी 2'च्या भूमिकेत आहे. राघवने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्याचं विनोदाचं टायमिंग कमाल आहे. तर दुसरीकडे 'पंगाक्वीन'ने आपली भूमिका चोख बजावली आहे. कंगनाचा रौद्र अवताराचं कौतुकचं. 

'चंद्रमुखी 2' हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीचा खिळवून ठेवणारा आहे. सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. पी वासु यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौतसह, राघव लॉरेंस, वडिवेलु, राधिका शरतकुमार, महिमा नांबियार, लक्ष्मी मेनन, सृष्टी डांगे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुभाषकरण अलीरजा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत.

Kangana Ranaut : कंगना रनौतला मोठा फटका; रिलीज होताच 'Chandramukhi 2' एचडी प्रिंटमध्ये लीक

View More
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
Ayesha Takia Birthday: अजय देवगनची ऑनस्क्रीन ‘सून’ अन् सलमानची ‘वॉन्टेड गर्ल’ आहे तरी कुठे? सर्जरीनंतर बदललेला लूक, आता काय करते?
अजय देवगनची ऑनस्क्रीन ‘सून’ अन् सलमानची ‘वॉन्टेड गर्ल’ आहे तरी कुठे? सर्जरीनंतर बदललेला लूक, आता काय करते?
Manjiri Oak on Sons Engagement: 'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...
'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष  संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 on OTT: बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
बॉक्स ऑफिसवर वादळी ठरला, आता धुरंधर 2 OTTवर येणार, Netflix नाही इथे होणार रिलीज? कधी येतोय?
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Embed widget