एक्स्प्लोर

Payal Kapadia FTII : ''पोरीनं कान्स गाजवलं, आता तरी खटला मागे घ्या''; ऑस्कर विजेत्या कलाकाराचं FTIIला आवाहन

Payal Kapadia FTII : 'ऑल वी इमेजिन एज लाइट' (All We Imagine as Light) या चित्रपटाने पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून पायल कपाडिया आणि चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Payal Kapadia FTII :  आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes 2024) भारताची विजयी पताका फडकवणारी दिग्दर्शिका पायल कपाडिया (Payal Kapadia)  सध्या चर्चेत आहे. कान्स महोत्सवात पायलच्या चित्रपटाने प्रतिष्ठेचा ग्रँड प्रिक्स पुरस्कारावर आपली मोहोर उठवली आहे. 'ऑल वी इमेजिन एज लाइट' (All We Imagine as Light) या चित्रपटाने पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून पायल कपाडिया आणि चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑस्कर विजेता कलाकार रसुल पोकुट्टी याने आता पायल आणि इतर विरोधातील खटला मागे घेण्याची आवाहन FTII ला केले आहे. 

पायल कपाडियाने हिने 'फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(FTII) या प्रख्यात संस्थेतून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे. या दरम्याने पायल कपाडिया आणि इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाविरोधात एफटीआयआय संस्थेने दाखल केलेल्या  तक्रारीवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

रसूल पुकुट्टी  यांनी काय म्हटले?

ऑस्कर विजेते साउंड डिझाइनर रसूल पुकुट्टी हे देखील एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी कान्समध्ये विजयी ठरलेल्या पायल कपाडिया आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रसूल पुकुट्टी यांनी पोस्ट करत म्हटले की,  आतातरी एफटीआयआयने पायल आणि इतर विद्यार्थ्यांविरोधत दाखल केलेले खटले मागे घेतले पाहिजे. 

Instagram पर यह पोस्ट देखें
 
Resul Pookutty (@resulpookutty) द्वारा साझा की गई पोस्ट

काय आहे प्रकरण?

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर 2015 मध्ये एफटीआयआयच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती ही राजकीय असून त्यांचा विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. चौहान यांच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल 139 दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता. 

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना ट्रोलिंग, अपशब्दाच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. पायल कपाडियासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना  देशविरोधी असल्याचा संबोधण्यात आले. काहींना तर पाकिस्तानतही जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget