20 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या 'या' चित्रपटासाठी रश्मी देसाईनं शूट केलेलं इंटिमेट गाणं; आता Viral होतोय VIDEO
Rashmi Desai Song: 20 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या चित्रपटात रश्मी देसाईनं केलेलं काम... एक इंटिमेट गाणं केलेलं शूट...
Rashmi Desai Song: टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी रश्मी बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातही गेली होती. त्यावेळी ती प्रचंड चर्चेत आली होती. आपल्या गेमनं तिनं आपल्या वेगळा फॅन बेस बनवला होता. अशातच एका जुन्या व्हिडीओमुळे रश्मी देसाई पुन्हा चर्चेत आली आहे. रश्मी देसाईचा 20 वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मी देसाई एक पंजाबी गाणं तेरियां मोहब्बता ने मार सुटियांवर डान्स करताना दिसून आली होती. या गाण्यात त्यांनी खूप इंटीमेट सीन्स दिले आहेत, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रश्मी देसाईचा जो जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते गाणं लम्हे जुदाई के (Yeh Lamhe Judaai Ke) या चित्रपटातील आहे. या गाण्याला आशा भोसले यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात रश्मी देसाईचं वय फारच कमी दिसत आहे. तसेच, अनेक युजर्सनी हा व्हिडीओ तिच्या पदार्पणाच्या काळातील असल्याचं सांगितलं आहे. काही युजर्सनी दावा केला आहे की, या गाण्याचं शुटिंग जेव्हा झालं, त्यावेळी रश्मी देसाईचं वय केवळ 18-20 वर्षांचं होतं.
घायाळ करणाऱ्या अदा, अफाट सौंदर्य... रश्मीचा सिझलिंग अंदाज
रश्मीच्या या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत 6 मिलियनहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. शेमारुनं हे गाणं युट्यूबवर अपलोड केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि रवीना टंडन लीड रोलमध्ये होते. लम्हे जुदाई के हा चित्रपट एक रोमांस मिस्ट्री चित्रपट होता. या चित्रपटात रश्मी देसाईनं शीतलचा रोल प्ले केला होता. हा चित्रपट 2004 मध्ये आला होता.
रश्मी देसाईला टीव्हीवर तिची खरी ओळख 'उतरन' या मालिकेतून मिळाली. रश्मी देसाईनं 'उतरन'मध्ये तपस्याची भूमिका साकारली होती. या टीव्ही मालिकेमुळे रश्मी देसाई हे नाव घराघरात पोहचलं. 2015 मध्ये मालिका बंद होण्यापूर्वी रश्मीनं आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होती. यानंतर ती बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
दरम्यान, रश्मीनं 2006 मध्ये रावण शोद्वारे टेलिव्हिजन विश्वात प्रवेश केला आणि परी हूं में या मालिकेत दुहेरी भूमिका साकारली. जरा नच के देखा, झलक दिखला जा आणि खतरों के खिलाडीमध्येही रश्मी देसाई सहभागी झाली होती.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :