Ranbir Kapoor Net Worth : रणबीर कपूर कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या त्याची संपत्ती
Ranbir Kapoor : 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत असणारा रणबीर कपूर कोट्यवधींचा मालक आहे.
Ranbir Kapoor Net Worth : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. रणबीरने चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'शमशेरा' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक केलं आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. पण 'ब्रह्मास्त्र' सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 25 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलेला रणबीर कोट्यवधींचा मालक आहे.
रणबीर कपूर सिनेमांत काम करण्यासाठी चांगलच मानधन घेतो. पण रणबीरची पहिली कमाई 250 रुपये होती. एका मुलाखतीत रणबीरने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम ग्रंथ' या सिनेमाचा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमात ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
रणबीरने त्याची पहिली कमाई त्याच्या आईच्या म्हणजेच नीतू कपूरच्या हाहात दिली होती. त्यावेळी नीतू कपूरला अश्रू अनावर झाले होते. आज रणबीर कपूरने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं नाव कमावलं आहे. तरीदेखील रणबीर त्याच्या आईकडून दर महिन्याला 1500 रुपये पॉकेट मनी घेतो.
रणबीरकडे आहे 359 कोटींचा मालक
रणबीर कपूरचे मुंबईतील वांद्रा याठिकाणी एक आलिशान घर आहे. रणबीरने 2016 साली हे घर 35 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. ऋषी कपूरची 256 कोटींची संपत्तीदेखील रणबीरच्या नावावर आहे. रणबीर 359 कोटींचा मालक आहे. यात कृष्णा राज, लग्झरी गाड्यांचादेखील समावेश आहे.
View this post on Instagram
रणबीर कपूरची सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत गणना होते. सिनेमे आणि जाहिरातींमधून रणबीर खूप पैसै कमावतो. एका सिनेमासाठी रणबीर 18 ते 20 कोटींचे मानधन घेतो. तर एका जाहिरातीसाठी तो 5 कोटींचे मानधन घेतो. सध्या रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे.
संबंधित बातम्या