Brahmastra : बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'चा धमाका; आलियानं प्रेक्षकांचे मानले आभार, म्हणाली...
नुकतीच आलियानं ब्रह्मास्त्र चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Brahmastra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (9 सप्टेंबर) रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला तसेच चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतीच आलियानं ब्रह्मास्त्र चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमधून चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तिनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
आलियाची पोस्ट
अयान मुखर्जीनं केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट आलियानं शेअर केला आहे. यामध्ये लिहिलं आहे, त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो, 'जे ब्रह्मास्त्र हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले. पुढील काही दिवसांची आम्ही वाट बघत आहोत.' याच बरोबर एक फोटो देखील आलियानं शेअर केला आहे. या फोटोमध्ये ब्रह्मास्त्रनं पहिल्या दिवशी 75 कोटी कमाई केली आहे, असं लिहिलं आहे. यासाठी देखील आलियानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
ब्रह्मास्त्र 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील ?
बॉयकॉट ट्रेंडचा ब्रह्मास्त्र चित्रपटावर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होईल, असंही म्हटलं जात आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :