एक्स्प्लोर
'बाहुबली 2' मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

मुंबई : 2017 मधील मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली : द कन्क्लूजन'चा फर्स्ट लूक दोन दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता चाहत्यांची आणखी उत्सुकता वाढवण्यासाठी सिनेमातील महत्त्वाचं पात्र भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबतीने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये राणाची शरीरयष्टी पाहून कोणीही दंग होईल.
राणा दग्गुबतीने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत ट्रेनरही दिसत आहे. राणाचा यापूर्वी कधीही न पाहिलेला लूक 'बाहुबली : द कन्क्लूजन'मध्ये पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचं पोस्ट 22 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात येईल, असं दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. राजामौली यांनी लिहिलं होतं की, चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात येईल. या ट्वीटसह एक हॅशटॅगही आहे, #WKKB (Why Katappa Killed Baahubali - कटप्पाने बाहुबलीला का मारलं?)
https://twitter.com/ssrajamouli/status/781892108667846656
प्रभासचा वाढदिवस 23 ऑक्टोबरला आहे, त्यामुळे त्याचा वाढदिवस आणखीच खास होणार आहे.
बाहुबली पाहिल्यानंतर कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असा प्रश्न प्रेक्षकांना पकडला आहे. मात्र याचं उत्तर केवळ तीन लोकांना माहित आहे. ते तीन जण म्हणजे अभिनेता प्रभास, दिग्दर्शक एस एस राजामौली आणि कथालेखक.

'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज, 22 ऑक्टोबर रोजी पहिले पोस्टर
सिनेमाच्या प्रदर्शनाआधी क्लायमॅक्स लीक होऊ नये, यासाठी राजामौली यांनी 'बाहुबली: द कन्क्लूजन'चे एक, दोन नाही तर एकूण चार क्लायमॅक्स चित्रीत केले आहेत. कोणता क्लायमॅक्स सिनेमात दाखवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर याबाब निर्णय घेण्यात येईल.'बाहुबलीः दी कन्क्लुझन' चा लोगो रिलीज
28 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement