एक्स्प्लोर

Ram Gopal Varma: श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..."

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं नुकतेच एक ट्वीट शेअर करुन श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत' असं ट्वीट राम गोपाल वर्मानं शेअर केलं आहे. 

Ram Gopal Varma:  श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले.  या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) नुकतेच एक ट्वीट शेअर करुन श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत' असं ट्वीट राम गोपाल वर्मानं शेअर केलं आहे. 

राम गोपाल वर्माचं ट्वीट

राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती.' 

दुसऱ्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मानं लिहिलं, 'तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे' राम गोपाल वर्माच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

राम गोपाल वर्मा हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टा व्हायरल होत असतात. राम गोपाल वर्मानं 'शिवा' या तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने पहिला हिंदी चित्रपट बनवला 'रंगीला', जो जबरदस्त हिट ठरला.

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ketaki Chitale: 'सनातनी मुलांनो, तुम्हाला सुधरावं लागेल'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Embed widget