Ketaki Chitale: 'सनातनी मुलांनो, तुम्हाला सुधरावं लागेल'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणामुळे संपूर्ण देश हदरला आहे.या संदर्भात केतकीनं (Ketaki Chitale) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणामुळे संपूर्ण देश हदरला आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाला अटक केली आहे. आता या संदर्भात केतकीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. केतकीनं तिच्या फेसबुक आणि इन्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत श्रद्धा हत्याकांड प्रकणावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाली केतकी?
केतकीनं तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'मेरा अबदुल ऐसा नहीं.बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण 35 तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय.मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?'
तर इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये केतकीनं लिहिलं, 'सनातनी मुलांनो तुम्हाला ही सुधरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पोकळ पुरुषार्थावर प्रेम करत राहाल तोपर्यंत मुली अब्दुल, अफताब, एहमद यांच्यासोबत दिसतील. कारण ही मुलं मुलींना पटवण्यासाठी त्यांना अटेंशन देतात त्यानंतर त्या मुलीला ते मारतात.'
पाहा केतकीची इन्स्टाग्रामवरील पोस्ट
एका नेटकऱ्यानं केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट देखील केतकीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी श्रद्धा मर्डर केसबाबत पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेता आस्ताद काळे, अभिनेत्री स्वरा भास्कर या सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
नेमकं प्रकरण काय?
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: