एक्स्प्लोर

Ram Charan : 'ऑस्कर'नंतर राम चरणची मोठी झेप; हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार!

Ram Charan : राम चरणने एका मुलाखतीत हॉलिवूड सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

Ram Charan Hollywood Debut : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या ऑस्करमुळे (Oscars 2023) चर्चेत आहे. राम चरणच्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. सिनेविश्वातील मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातदेखील या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने बाजी मारली आहे. आता राम चरण भारतात परतला असून नुकत्याच एका मुलाखतीत त्याने हॉलिवूडच्या (Hollywood) सिनेमात काम करण्याबद्दल भाष्य केलं आहे.  

हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राम चरण सज्ज (Ram Charam Hollywood Debut)

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राम चरण म्हणाला की, "हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मी सज्ज आहे. पण याबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. सध्या यावर काम सुरु असून लवकरच मी याबद्दल घोषणा करेन. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते". राम चरणने सिनेमाबद्दल अधिक माहिती दिली नसली तरी तो हॉलिवूडच्या सिनेमात झळकणार असल्याने त्याचे चाहते आनंदी असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

भारतात येण्याआधी अमेरिकेतदेखील एका मुलाखतीत राम चरणने हॉलिवूड सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच 'आरआरआर'नंतर आणखी एक मोठा प्रोजेक्ट हातात असल्याबद्दल भाष्य केलं होतं. भारतात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर राम आता जगभरातील चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल. 

राम चरणचे आगामी सिनेमे (Ram Charan Upcoming Project)

राम चरणचा 'आरआरआर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो 'RC15' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा जानेवारी 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सिनेमात राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' या आगामी सिनेमातदेखील राम चरणची झलक पाहायला मिळणार आहे. 

हॉलिवूडच्या सिनेमात राम चरण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत स्क्रीन शेअर करु शकतो. तसेच टॉम क्रूझ, ज्युलिया रॉबर्ट्स आणि ब्रॅड पिट यांच्यासोबत काम करण्याची इच्छा राम चरणने व्यक्त केली आहे. 

संबंधित बातम्या

RRR 2 : 'आरआरआर 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ऑस्करनंतर राजामौलींची मोठी घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
Chandrapur Kidney Case : चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाचे चीन कनेक्शन,SIT च्या तपासा धक्कादायक माहिती
Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
Embed widget