Rakht Brahmand : मिर्झापूरचा गुड्डू पंडित समंथासोबत झळकणार, रक्त ब्रह्मांड वेब सीरिजसाठी अली फजलचं नाव फायनल
Ali Fazal and Samantha Ruth Prabhu : अभिनेता अली फजल आणि समंथा आगामी 'रक्त ब्रह्मांड' या वेब सीरिजमध्ये एकत्र झळकणार आहेत.
मुंबई : अभिनेता अली फजल (Ali Fazal) सध्या 'मिर्झापूर 3' (Mirzapur 3) वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे. मिर्झापूरमुळे अली फजलला स्टारडम मिळालं असून त्याला चांगल्या प्रोजेक्टच्या ऑफर्स मिळत आहेत. आता त्याला आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. अभिनेता अली फजल अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) स्क्रिन शेअर करणार आहे. अली फजल आणि समंथा आगामी 'रक्त ब्रह्मांड' या वेब सीरिजमध्ये एकत्र झळकणार आहेत. या सीरिजचं शूटिंग पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिर्झापूरचा गुड्डू पंडित समंथासोबत झळकणार
अभिनेत्री अली फजल आणि पत्नी रिचा चढ्ढा यांच्या घारी काही दिवसांपूर्वींच गोंडस मुलीचा आगमन झालं आहे. या चिमुकलीचं आगमन अली फजलसाठी लकी चार्म ठरलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, एकीकडे मिर्झापूर 3 ची सफलता आणि दुसरीकडे नव्या वेब सीरिजची ऑफर अशी पॉझिटिव्ह वातावरण अलीच्या आयुष्यात दिसत आहे.
रक्त ब्रह्मांड वेब सीरिजसाठी अली फजलचं नाव फायनल
अली फजलने 'मिर्झापूर सीझन 3' मध्ये गुड्डू पंडितच्या भूमिकेतून त्याने चाहत्यांची मने जिंकली. मीडिया रिपोर्टनुसार, अली फजल आता 'रक्त ब्रह्मांड' सीरिजमध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'रक्त ब्रह्मांड' वेब सीरिज राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असून ही सीरिज 6 भागांची मालिका असणार आहे.
पुढील आठवड्यात शूटिंगला सुरुवात
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'रक्त ब्रह्मांड' वेब सीरिजची संपूर्ण कास्ट फायनल झाली असून याचं शूटिंग पुढील आठवड्यात मुंबईत सुरू होणार आहे. अली फजल त्याच्या इतर प्रोजेक्ट्ससह ऑगस्टमध्ये या मालिकेसाठी शूटिंग करणार असल्याची माहिती आहे. या सीरिजमध्येआदित्य रॉय कपूर आणि वामिका गब्बी देखील दिसणार आहेत.
अली फजलचे आगामी चित्रपट
अली फजलकडे अनुराग बसूच्या 'मेट्रो... दिस डेज' चित्रपटात झळकणार असून 29 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अली 'लाहोर इन 1947'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात प्रीती झिंटा आणि सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त, अली मणिरत्नम यांच्या 'ठग लाइफ' चित्रपटाचाही भाग असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :