(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phir Aayi Hasseen Dillruba : "जो पागलपन की हदसे ना गुजरे, वो प्यार ही क्या", फिर आई हसीन दिलरुबाचा दमदार ट्रेलर, तापसी-विक्रांत आणि सनीची सेन्सेशनल केमिस्ट्री
Phir Aayi Hasseen Dillruba Trailer : "फिर आई हसीन दिलरुबा चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये तापसी-विक्रांत आणि सनीची सेन्सेशनल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
मुंबई : बहुप्रतिक्षित अशा "हसीन दिलरुबा" (Hasseen Dillruba) चित्रपटाच्या दुसरा भाग "फिर आई हसीन दिलरुबा" (Phir Aayi Hasseen Dillruba) चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तीन वर्षांनंतर चाहत्यांना या चित्रपटाचा सीक्वेल पाहायला मिळणार आहे. "फिर आई हसीन दिलरुबा" चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला असून यामुळे चाहत्यांची आतुरता आणखी वाढली आहे. 2021 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेला हसीन दिलरुबा चित्रपट चांगलचा हिट ठरला होता. चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय, स्क्रिनप्ले सगळं काही उत्तम होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. आता चित्रपटाच्या सीक्वेलकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
'फिर आई हसीन दिलरुबा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी राणी आणि ऋषी सक्सेना परतणार आहेत. 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा एक दमदार ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल यांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी, विक्रांत आणि सनी यांच्याभोवती फिरणारी रहस्यमय प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
तापसी-विक्रांत आणि सनीची सेन्सेशनल केमिस्ट्री
तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा सीक्वेल तयार झाला असून आता हा लवकरच ओटीटी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबत विक्रांत मेस्सी, जिमी शेरगिल आणि सनी कौशल चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. फिर आई हसीन दिलरुबा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
"जो पागलपन की हदसे ना गुजरे, वो प्यार ही क्या"
दिलरुबा जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की, तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरले. पण, पोलिसांनी या प्रकरणातून अद्यापही हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलने यांना पकडण्याची जबाबदारी घेतली आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्यांनी म्हटलं आहे की, यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांच मेस्सी त्याचं भूमिकेत दिसणार आहेत, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतली आहे. या चित्रपटाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.