एक्स्प्लोर
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार पटकवणारा 'न्यूटन' सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा 'न्यूटन'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचे निर्माते मनीष मुन्द्रा हे आहेत. सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 67व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर देखील पार पडला आहे. या फेस्टिव्हलमध्ये 'न्यूटन'नं सीआयसीएई पुरस्कार देखील पटकवला आहे. अमित मसुरकर यांनी लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिका पार पाडल्या आहेत. 'न्यूटन'मध्ये राजकुमार राव यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, रघुवीर यादव हे कलाकारही असणार आहेत. हा सिनेमा 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. VIDEO
आणखी वाचा























