Bheed : कोरोनाकाळावर भाष्य करणारा राजकुमार रावचा 'भीड'; ट्रेलर आऊट
Bheed : राजकुमार राव आणि भूमी पेडनेकरच्या आगामी 'भीड' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Rajkummar Rao Bhumi Pednekar Bheed Trailer Out : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumaar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) आगामी 'भीड' (Bheed) या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'भीड'च्या ट्रेलरमध्ये काय आहे?
राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडनेकरच्या (Bhumi Pednekar) 'भीड'चा ट्रेलर (Bheed Trailer Out) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये कोरोनाकाळ, त्यावेळची परिस्थिती, कोरोनाकाळात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. कोरोनाकाळत वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. कोरोनाकाळात सरकार आणि व्यवस्थेची भूमिका काय होती हे या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे.
View this post on Instagram
'भीड' कधी होणार रिलीज?
'भीड' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुभव सिन्हाने सांभाळली आहे. लॉकडाऊनच्या तीन वर्षांनंतर 24 मार्च 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरसह पंकज कपूर, दिया मिर्झा, आशुतोष राणा, कृतिका कामरा, वीरेंद्र सक्सेना आणि आदित्य श्रीवास्तव या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
'भीड' हा सिनेमा मोनोक्रोम फिल्टरमध्ये बनवण्यात आला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी होईल. राजकुमार रावने या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलं आहे, "देशासमोरील सर्वात वाईट काळ... एक माणूस बदल घडवून आणण्याचे धाडस करेल. आता ट्रेलर आऊट झाला आहे".
'भीड' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाला,"भीड' हा सिनेमा माझ्यासाठी खूपच खास आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा प्रामाणिकपणे बनवण्यात आला आहे. पुन्हा एकदा कोरोनाकाळ दाखवण्यासाठी या सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही खूप मेहनत घेतली आहे. समाजातील अनेक गोष्टी या सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. 'भीड' हा भावनिक सिनेमा असून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा सिनेमा आहे".
संबंधित बातम्या