एक्स्प्लोर

रिव्ह्यू: पुष्पक विमान- लेट झालेलं विमान

पुष्पक विमान या सिनेमाची गोष्ट तशी लहान आहे. पण सिनेमा करताना त्यातली पटकथा मोठी केल्यामुळे हा सिनेमा कमालीचा लांबतो.

गेल्या काही दिवसांपासून पुष्पक विमान या सिनेमाची चर्चा आहे. एकतर सुबोध भावे आणि मोहन जोशी असे दोन गुणी अभिनेते बऱ्याच दिवसांनी एका सिनेमात दिसतायत ही एक बाजू. आणि लेखनाचं अंग असलेल्या वैभव चिंचाळकर यांनी या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केल्याने, आता त्यांच्या कामगिरीकडे असलेलं लक्ष हे त्याचं दुसरं कारण. या सिनेमाची गोष्ट तशी लहान आहे. पण सिनेमा करताना त्यातली पटकथा मोठी केल्यामुळे हा सिनेमा कमालीचा लांबतो. त्यामुळे तो कंटाळवाणा होतो. तात्या जळगावला राहतात. गावात कीर्तनकार म्हणून त्यांचा लौकीक. कीर्तनातून तुकारामाची गोष्ट सांगता सांगता त्यांना तुकोबांना न्यायला आलेल्या पुष्पक विमानाचं भारी अप्रूप आहे. त्यांचा एकुलता एक नातू विलास मुंबईला असतो. त्याचं लग्न झालंय. पण बरीच वर्षं तो जळगावला आलेला नाही. तो तात्यांना सतत मुंबईला बोलावतोय. पण तात्या तिकडे जायला काही तयार नाहीत. एक दिवस काही कारणाने तात्या पडतात आणि विलास जळगावला येतो. त्यांच्याशी बोलून विलास त्यांना मुंबईला आणतो. गावात ऐसपैस राहिलेल्या तात्यांना मुंबई अडचणीची वाटू लागते. तरी कसेबसे काही दिवस काढून तात्या जळगावला जायचा हट्ट धरतात. अन त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरून विमान उडतं. त्याला पाहून तात्या विस्मयचकीत होतात. विलास त्यांना या विमानात बसवायचं मान्य करतो आणि आपण पुष्पकमध्ये बसणार याची कल्पना तात्यांनी सुखावते. मग हा प्रवास नेमका कसा घडतो त्याची ही गोष्ट. सिनेमातले संवाद मनात घर करतात. उदाहरण द्यायचं तर ट्रेलरमध्ये असलेल्या आजोबा नातवाच्या नात्याचं देता येईल. आजोबासाठी नातू म्हणजे आयुष्याचा शेवट. तर नातवासाठी आजोबा म्हणजे सुरूवात, हा संवाद कमाल आहे. आयुष्य वाढतं तसं आत्मा स्वाभिमानी होतो आणि शरीर परावलंबी हा संवादही महत्वाचा. विमानाला पाहून तात्यांचा हा कुठला पक्षी असं विचारणंही कन्व्हिंन्सिंग पाटत नाही. यातले संवाद सोपे सहज असले तरी पटकथा लिहिताना मात्र ती लांबली आहे. पहिल्या भागात व्यक्तिरेखा उभ्या राहतात. पण त्या पलिकडे इथे फार काही घडत नाही. तर दुसऱ्या भागात गाणी जरा जास्त झाली आहेत. त्यातलं शौनक अभिषेकी आणि जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेलं गाणं सुरेख जमून आलंय. पण त्यातलं मुंबईचं गाणं मात्र ऐकायला बरं वाटतं. पण त्याचं चित्रिकरण रूचत नाही. गाण्यात सतत आजुबाजूच्यांना नाचवणं रम्य वाटत नाही. शिवाय, तात्यांना असलेला मामुला आजार विलास त्यांना का सांगत नाही तेही कळत नाही. त्यामुळे पुढे घडणाऱ्या मेलोड्रामावर प्रश्न निर्माण होतो. तसाच शेवटही घाईघाईचा झालेला. या सिनेमातले अनेक प्रसंग आपण यापूर्वी इतर सिनेमात पाहिलेत असं वाटून जातं. विशेषत: विलास आणि फिरोज यांच्यातले संवाद. या प्रकारामुळे सिनेमा कमालीचा लांबला आहे. दोन तासांचा हा सिनेमा साधारण ९० मिनिंटांत संपवला असता तर धमाल आली असती  असं वाटून जातं. एक नक्की यात कमाल केली आहे ती मोहन जोशी यांनी. त्यांचा तात्या अफलातून आहे. त्यांच्यामुळे यातले संवाद आणखी जिवंत होतात आणि सिनेमा खिळवून ठेवतो. अतिशय सहज अभिनय ही त्यांची जमेची बाजू. गावात असताना त्यांचं विसराळू असणं.. विलाससाठी केलेला आटापिटा कमाल आहे. त्यावेळी मुंबईत आल्यानंतर डोळे दिपवून टाकणारे अनुभव दाखवणंही तितकंच कमाल. सुबोधनेही आपल्या भूमिकेची मर्यादा ओळखून काम केल आहे. राहुल देशपांडे यांची भूमिका छोटी असली तरी तिथे चांगला अभिनेता  हवा होता का असं वाटून जातं. गौरी किरण ही नवी नायिका पडद्यावर पदार्पण करते आहे. तिची भूमिका छोटी असली तरी तिने ती नेटकी वठवली आहे. एकूणात, हा सिनेमा लांबल्यामुळे काहीसा कंटाळवाणा होऊ लागतो. तो जरा कसून बांधला असता तर धमाल आली असती हे नक्की. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत दोन स्टार. पण.. मोहन जोशी यांच्या अभिनयाने यावर अर्धा स्टार मिळवला आहे. म्हणूनच सिनेमाला एकूणात मिळतात अडीच स्टार. 

महत्त्वाच्या बातम्या

Bhagyashrees Daughter Avantika Dassani Sangli: अभिनेत्री भाग्यश्रीच्या समर्थनार्थ लाडकी लेक मैदानात; पटवर्धन घराणं अन् सांगलीच्या मंदिरातील PHOTOs शेअर करत म्हणाली..
अभिनेत्री भाग्यश्रीच्या समर्थनार्थ लाडकी लेक मैदानात; पटवर्धन घराणं अन् सांगलीच्या मंदिरातील PHOTOs शेअर करत म्हणाली..
Surya Movie Kanguva OTT: पुनर्जन्म अन् प्रसिद्ध अभिनेत्याचा डबल रोल; सिनेमागृहात फ्लॉप पण OTTवर हिट, टॉप 10मध्ये जागा मिळणारा 'हा' थ्रिलर चित्रपट पाहिलात?
पुनर्जन्म अन् प्रसिद्ध अभिनेत्याचा डबल रोल; सिनेमागृहात फ्लॉप पण OTTवर हिट, टॉप 10मध्ये जागा मिळणारा 'हा' थ्रिलर चित्रपट पाहिलात?
Veteran Actress Mithu Mukherjee Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास; 'या' बॉलिवूड हिट सिनेमात केलं होतं काम
प्रसिद्ध अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास; 'या' बॉलिवूड हिट सिनेमात केलं होतं काम
Mansi Kulkarni on Second marriage: दुसऱ्या लग्नाबाबत मानसी कुलकर्णीचा विचार काय? म्हणाली, ' लेक लहान अन् सासरचे म्हणतात दुसरं लग्न...'
दुसऱ्या लग्नाबाबत मानसी कुलकर्णीचा विचार काय? म्हणाली, ' लेक लहान अन् सासरचे म्हणतात दुसरं लग्न...'

व्हिडीओ

Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका, पराभवानंतर विजय होतो, राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन; राहुल बोंद्रेंचा काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय
राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना राहुल बोंद्रे भावूक, काँग्रेसमध्येच थांबून लढण्याचा राहुल बोंद्रे यांचा शब्द
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या
दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, आर्थिक संकटात कर्ज देखील मिळतं...
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
Embed widget